SPPU Rap Song Case : RockSun शुभम जाधव हाजीर हो! कुणाचे घेणार नाव?

पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या सभागृहात व आवारात अश्लील शिव्यांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

SPPU Rap Song Case : RockSun शुभम जाधव हाजीर हो! कुणाचे घेणार नाव?
SPPU Rap Song Case

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क               

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (SPPU) वादग्रस्त रॅप साँग प्रकरणी (Rap Song Case) स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीचे कामकाज सुरू असून येत्या सोमवारी रॉकसन शुभम जाधव (RockSun Shubham Jadhav) याला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यामुळे या चौकशीतून कोणता उलगडा होतो; हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मात्र चौकशी समितीचा अहवाल सादर करण्यास ८ ते १० दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. (SPPU Rap Song Case)                                            

पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या सभागृहात व आवारात अश्लील शिव्यांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. विद्यापीठाची परवानगी न घेता रॅप साँगचे चित्रीकरण केल्याप्रकरणी शुभम जाधवसह त्याच्या सहकाऱ्यांबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून विद्यापीठाने माजी पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे.

हेही वाचा : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सरकारने कंबर कसली!

समितीमध्ये विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य बागेश्री मंठाळकर, अधिसभा सदस्य प्रसेनजीत फडणवीस, प्रतिष्ठित प्राध्यापक निवृत्त कॅप्टन चंद्रशेखर चितळे, आजीवन अध्ययन व विस्तार केंद्राचे संचालक डॉ. विलास आढाव आणि उपकुलसचिव डॉ. मुंजाजी रासवे यांचा समावेश आहे. थेट राज्यपाल कार्यालयाने या प्रकरणाकडे लक्ष दिल्यामुळे समितीचे कामकाज वेगाने सुरू आहे. आत्तापर्यंत सुरक्षा विभाग, कुलसचिव कार्यालय आणि रॅप सॉंग तयार करणाऱ्या काही तरुणांची सुनावणी नोंदवून घेण्यात.

येत्या सोमवारी शुभम जाधव याचे म्हणणे नोंदवून घेतले जाणार आहे. सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांसह  कुलसचिव कार्यालयातील कर्मचाऱ्यांची सुमारे एक ते दीड तास सुनावणी नोंदवून घेतली जात आहे. त्यात बरीच धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे चौकशी अहवाल सादर झाल्यानंतर कोणावर कारवाई होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, शुभम जाधव याने विद्यापीठातील एका अधिकाऱ्याने आपल्याला तोंडी परवानगी दिल्याची कबुली माध्यमांसमोर दिली आहे. त्यामुळे समितीसमोरही तो संबंधित अधिकाऱ्याकडे बोट दाखविणार का, याबाबत उत्सुकता आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2