पाचवी , आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ

३१ डिसेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत परीक्षा अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घेऊन शाळांनी ऑनलाईन अर्ज ७ डिसेंबरअखेरपर्यंत भरण्याची कार्यवाही करावी.

पाचवी , आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत (Maharashtra State Council of Examination) इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा (5th, 8th Scholarship Examination) येत्या १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन अर्ज (Online application) भरण्याकरीता येत्या ७ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ (extension of time)देण्यात आली आहे.

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्यास यंदा लवकर सुरूवात करण्यात आली.त्यामुळे परीक्षेस प्राविसहठ होणा-या विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळा मिळणार आहे.गेल्या काही वर्षांपासून शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत आहे. तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्याही कमी झाली आहे.मात्र, त्यात सुधारणा करण्यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे.

हेही वाचा : अल्पसंख्यांक संस्थेतील शिक्षकांना टीईटी लागू नाही ; अध्यादेश काढण्याचे निर्देश

दरम्यान, येत्या ७ डिसेंबरपर्यंत  नियमित शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. विलंब शुल्कासह ८ ते १५ डिसेंबर, अतिविलंब शुल्कासह १६ ते २३ डिसेंबर, अतिविशेष विलंब शुल्कासह २४ ते ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज  भरण्याबाबतचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ३१ डिसेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत परीक्षा अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घेऊन शाळांनी ऑनलाईन अर्ज ७ डिसेंबरअखेरपर्यंत भरण्याची कार्यवाही करावी, असे परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी कळविले आहे.