सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व विद्यार्थ्यांना मिळणार 'आरटीई'मधून प्रवेश

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४९ शाळांमधील २८७ जागांसाठी केवळ १९२ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात अर्ज करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश मिळू शकतो.येथील पालकांना ऑनलाइन लॉटरी काढल्यानंतर कोणत्या शाळेमध्ये प्रवेश मिळतो, एवढेच पहावे लागणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व विद्यार्थ्यांना मिळणार 'आरटीई'मधून प्रवेश

RTE admission : आरटीई प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येने तब्बल ३ लाखांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आरटीई प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी फार कमी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल,असे दिसून येत आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात Sindhudurg district प्रवेश अर्ज करणाऱ्या  सर्व विद्यार्थ्यांना students प्रवेश मिळण्याची शक्यता आहे.

   पालकांच्या मागणीनुसार आरटीईचा अर्ज भरण्यास येत्या २५ मार्चपर्यंत मदतवाढ देण्यात आली आहे.  राज्यातील ८ हजार ८२८ शाळांमधील १ लाख १ हजार ९६९ जागांसाठी आतापर्यंत सर्वाधिक ३ लाख २६ हजार ८५० अर्ज प्राप्त झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील १५ हजार ६५५ जागांसाठी ७० हजार ५९३ अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आरटीई प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एकूण प्रवेश क्षमतेच्या दुप्पट किंवा तिप्पटीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये प्रवेशासाठी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. 

  सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४९ शाळांमधील २८७ जागांसाठी केवळ १९२ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात अर्ज करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश मिळू शकतो.येथील पालकांना ऑनलाइन लॉटरी काढल्यानंतर कोणत्या शाळेमध्ये प्रवेश मिळतो, एवढेच पहावे लागणार आहे.

दरम्यान शासकीय कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेसाठी बेमुदत संप पुकारला आहे.त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र काढून घेणे पालकांना शक्य होत नाही.ही बाब विचारात घेऊन शिक्षण विभागाने आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी व पालकांच्या हिताचा सकारात्मक निर्णय घ्यावा,अशी मागणी आप पालक युनियनचे मुकुंद किर्दत यांनी केली आहे.