JEE Advanced AAT 2023 : नोंदणी करण्यासाठी आज शेवटची संधी

परीक्षेतून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना आयआयटी मुंबई, आयआयटी (बीएचयू) वाराणसी आणि आयआयटी रुरकी या संस्थांमध्ये आर्कितटेक्चरच्या पदवी अभ्यासक्रमात प्रवेश मिळू शकेल.

JEE Advanced AAT 2023 : नोंदणी करण्यासाठी आज शेवटची संधी
JEE Advanced AAT 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

JEE Advanced 2023 ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी AAT ( आर्किटेक्चर अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट) साठीची नोंदणी करण्याची आज शेवटची संधी आहे. विद्यार्थ्यांना सायंकाळी पाच वाजेपर्यंतच ऑनलाईन नोंदणी करता येईल.

परीक्षेतून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना आयआयटी मुंबई (IIT Mumbai), आयआयटी (बीएचयू) वाराणसी (IIT Varanasi) आणि आयआयटी रुरकी (IIT Roorki) या संस्थांमध्ये आर्कितटेक्चरच्या पदवी अभ्यासक्रमात प्रवेश मिळू शकेल. आयआयटी गुवाहाटीमार्फत ही परीक्षा प्रक्रिया राबविली जात आहे. त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. १९ जून रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच आहे.

11th Admission : केंद्रीय प्रवेशप्रक्रियेतील जागा वाढणार, राज्यात कोटा प्रवेशाला अल्प प्रतिसाद

JEE अडवान्स्ड AAT ही परीक्षा २१ जून रोजी घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना ही परीक्षा फक्त इंग्रजीतून देता येणार आहे. ही परीक्षा ऑफलाईन होणार असून परीक्षेचा कालावधी ३ तासांचा असणार आहे. या परीक्षेत  फ्रीहँड ड्रॉइंग, भौमितिक रेखाचित्र, त्रिमितीय धारणा, कल्पनाशक्ती आणि सौंदर्यविषयक संवेदनशीलता, वास्तुशास्त्रीय जागरूकता आदी विषय असणार आहेत.

JEE अडवान्स्ड AAT साठी अशी करा नोंदणी -

१.  jeeadv.ac.in या वेबसाइटला भेट द्या

२: वेबसाइटवर दिलेल्या नोंदणी लिंकवर क्लिक करा

 ३: तुमची JEE Advanced 2023 नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख आदी माहिती भरा.

 ४. सेव्ह आणि सबमिट करा.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo