विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या कॅम्पसमध्ये उभारा सेल्फी पॉईंट्स ; युजीसीच्या सूचना 

देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांना कॅम्पसमधील मोक्याच्या ठिकाणी सेल्फी पॉईंट्स उभारण्यास सांगितले आहे. मात्र यासाठी युजीसीकडून काही नियम करण्यात आले आहेत.

विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या कॅम्पसमध्ये उभारा सेल्फी पॉईंट्स ; युजीसीच्या सूचना 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

फक्त युवा वर्गच नव्हे तर सर्व वयोगटातील लोकांमध्ये सेल्फीची वाढती क्रेज पाहता विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) ने  देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांना कॅम्पसमधील (university and college campuses) मोक्याच्या ठिकाणी सेल्फी पॉईंट्स (Selfie points ) उभारण्यास सांगितले आहे. मात्र यासाठी युजीसीकडून काही नियम ( rules from UGC) करण्यात आले आहेत.शिक्षण मंत्रालयाने शेअर केलेल्या 3D लेआउटमध्ये मान्यताप्राप्त डिझाइननुसारच संस्थांना सेल्फी पॉइंट ठेवता येतील.

हेही वाचा : शिक्षण NSS च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी...

 या विषयी माहिती देताना युजीसीचे सचिव मनीष जोशी म्हणाले , " सेल्फी पॉइंटच्या थीममध्ये “एक भारत, श्रेष्ठ भारत” यासारख्या राष्ट्रीय उपक्रमांचा विस्तृत स्पेक्ट्रम आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP- 2020) मधील प्रमुख क्षेत्रांचा समावेश असेल."

विद्यार्थी आणि इतर नागरिकांना काही  विशेष क्षण कॅप्चर करण्यासाठी आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यासाठी, तसेच देशाप्रती  सामूहिक अभिमानाची भावना वाढवण्यासाठी या सेल्फी पॉईंटचा उपयोग होईल.  हे सेल्फी पॉइंट्स केवळ अभिमानाचे स्रोतच नाहीत तर जागतिक स्तरावर भारताच्या विकासाला चालना देणार्‍या परिवर्तनात्मक उपक्रमांबद्दल प्रत्येक नागरिकाला प्रबोधन करतील, असेही जोशी यांनी सांगितले.

"भारताच्या विविध क्षेत्रांतील प्रगतीतून घेतलेल्या प्रेरणेने तरुणांची उर्जा आणि उत्साह यांचा उपयोग करून त्यांची मने तयार करण्याची अनोखी संधी या  माध्यमातून मिळणार आहे. या संस्थांमधील सेल्फी पॉइंट्स राष्ट्रीय अभिमानाची भावना जागृत करण्यासाठी आणि तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी गतिशील आणि आकर्षक जागा म्हणून उदयास येतील," असेही जोशी म्हणाले.