चीनचा उदय आणि त्याचे जागतिक परिणाम : पुणे विद्यापीठात दोन दिवसीय सामरिक संवाद परिषद ;  लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांची उपस्थिती

चीनचा उदय आणि त्याचे जागतिक परिणाम या विषयावर दुसऱ्या सामरिक संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.पुणे विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर सभागृहात येत्या २७ व २८ मार्च रोजी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.

चीनचा उदय आणि त्याचे जागतिक परिणाम : पुणे विद्यापीठात दोन दिवसीय सामरिक संवाद परिषद ;  लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांची उपस्थिती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग व दिल्ली येथील सेंटर फॉर चायना अनालिसिस अँड स्ट्रॅटेजी यांच्या संयुक्त विद्यमाने चीनचा उदय आणि त्याचे जागतिक परिणाम या विषयावर दुसऱ्या सामरिक संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.पुणे विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर सभागृहात येत्या २७ व २८ मार्च रोजी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.विजय खरे म्हणाले, मागील वर्षीपासून ही सामरिक संवाद परिषद आयोजित केली जात आहे. चीनच्या जागतिक स्थरावरील वाढत्या विस्ताराचे जगावर राजकीय, आर्थिक , सांस्कृतिक असे अनेक बहुरंगी परिणाम होत आहेत. या सामरिक संवाद परिषदेच्या माध्यमातून जागतिक स्थरावरील नावाजलेले तज्ज्ञ या विषयांवर मंथन करण्याकरिता सहभागी होतात. 

भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या बीजभाषणाने या परिषदेच्या उद्घाटन सत्राची सुरुवात होईल. या सत्रात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.नितीन करमळकर, माजी कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे , सेंटर फॉर चायना अनालिसिस अँड स्ट्रॅटेजीचे अध्यक्ष जयदेव रानडे आदी  उपस्थित राहणार आहेत,असेही डॉ. खरे यांनी सांगितले.

दोन दिवस चालणाऱ्या या सत्रात चीन मधील भारताचे माजी राजदूत गौतम बंबावले, गुजरातच्या महाराज सयाजी राव गायकवाड विद्यापीठातील प्रा.दिलीप मोहिते- प्राध्यापक डॉ.श्रीकांत परांजपे, प्राध्यापक डॉ.विजय खरे व सेन्टर फॉर चीन अनालयसिस अँड स्ट्रॅटेजिचे जयदेव रानडे, एअर मार्शल भूषण गोखले, अमेरिकन दूतावासाचे जिम विल्सन, टोकियो येथील इंडो पॅसिफिक स्ट्रॅटेजिक स्टडीज केंद्राचे प्रा.डॉ.अकिमोटोदैसुके, मूळचे तैवानी असलेले व सध्या फ्लेम विद्यापीठात कार्यरत असलेले प्रा.रॉजर लिऊ, एअर मार्शल एस.एस.सोमण, प्रा.डॉ.अरविंद कुमार, आदी मार्गदर्शन करणार आहेत.

------