एज्युवार्ता बाल गणेशोत्सव स्पर्धा ; खास शालेय विद्यार्थ्यांसाठी , बक्षिसांची लयलूट करण्याची संधी

गणेशोत्सवा निमित्त शाळेतील मुलांच्या आनंदात भर घालण्यासाठी एज्युवार्ताने प्ले ग्रुप ते इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी बाल गणेश स्पर्धा आयोजित केली आहे.

एज्युवार्ता बाल गणेशोत्सव स्पर्धा ; खास शालेय विद्यार्थ्यांसाठी , बक्षिसांची लयलूट करण्याची संधी
Eduvarta Bal Ganeshotsav Competition

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

गणपती बाप्पाच्या आगमनाने वातावरण मंगलमय आणि प्रसन्न झाले असून लहान मुलांमध्ये तर मोठ्या आनंदाचे वातावरण आहे.हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी 'एज्युवार्ता'ने आयोजित केलीये 'एज्युवार्ता बाल गणेशोत्सव स्पर्धा'.(Eduvarta Bal Ganeshotsav Competition) ही स्पर्धा केवळ शाळेतील विद्यार्थ्यांसाठी असून स्पर्धेत (Competition for school students) सहभागी  होणा-या विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसांची लयलूट करता येणार आहे.पर्यावरण पूरक गणपती या विषयावर स्पर्धा असली तरी स्पर्धेची थीम जरा हटके आहे.

हेही वाचा : दत्तक शाळा योजनेचा जीआर आला; शाळेला नाव अन् ३ कोटींपर्यंतच्या वस्तुंची देणगी...

गणपती बाप्पाचे नाव घेताच सा-या आसमंतात जणु आनंदी आनंद पसरतो.बुद्धीची देवता असणाऱ्या आपल्या लाडक्या बाप्पाचे मंगळवारी (दि.१९ )आगमन झाले.श्रीं च्या आगमनाने लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांमध्ये जल्लोष अन् उत्साह  संचारला आहे.याच गणेशोत्सवा निमित्त शाळेतील मुलांच्या आनंदात भर घालण्यासाठी एज्युवार्ताने प्ले ग्रुप ते इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी बाल गणेश स्पर्धा आयोजित केली आहे.पर्यावरणाचा होत चाललेला -हास तुम्हा आम्हाला पहावत नाही.त्यामुळेच जर गणपती बाप्पा तुमच्याबरोबर असते तर तुम्ही पृथ्वीचा होत चाललेला -हास थांबवण्यासाठी बाप्पाच्या मदतीने काय केले असते. हीच आहे स्पर्धेची थीम.

पाणी प्रदूषण , हवा प्रदूषण, वायु , जंगल तोड, वृक्ष तोड यातून पृथ्वीचे अर्थात आपल्या वसुंधरेचे मोठे नुकसान होते.पृथ्वीवरील साधन संपत्ती नष्ट होण्यापासून थांबविण्यासाठी गणपती बाप्पा तुमच्याबरोबर तुम्ही काय करायला, या विषयावरील विविध रंगांचा वापर करून काढलेले कोणतेही चित्र तुम्ही स्पर्धेसाठी पाठवू शकता. तसेच स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्ही पर्यावरण रक्षणावरील लघु नाटिकेचा व्हिडिओ पाठवू शकता.त्याचबरोबर पाना- फुलांचा किंवा पर्यावरणपुरक  विविध वस्तूंचा वापर करून गणपतीचे चित्र काढून पाठवता येईल.एवढेच नाही तर शाळा व विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा व्हिडिओ तयार करूनही पाठवता येईल.या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्याला प्रमाणपत्र आणि विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी दिली जाईल.शाळा व विद्यार्थ्यांना येत्या २७  सप्टेंबरपर्यंत स्पर्धेसाठी चित्र व व्हिडिओ पाठवता येतील. चित्र व व्हिडिओ पाठवताना : विद्यार्थ्यांचे नाव , शाळेचे नाव , वर्ग , आणि संपर्क क्रमांक पाठवावा. चलातर मग मोठ्या संख्येने एज्युवार्ताच्या स्पर्धेत सहभागी व्हा आणि बक्षिसांची लयलूट करा.  

-----------------------------------------------------

  काय आहेत स्पर्धेच्या अटी
1) या स्पर्धेत केवळ शाळेतील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. 
2) शाळेच्या गणवेशात शूट केलेला व्हिडिओ स्पर्धेसाठी आवश्यक आहे. 
3) विशिष्ट ड्रेपरी परिधान केलेला शाळेत किंवा घरी शूट केलेला चांगला व्हिडिओ सुध्दा स्वीकारला जाईल.
4) प्ले ग्रुप ते इयत्ता नववीचे विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

5) शाळा व विद्यार्थ्यांना येत्या २७ सप्टेंबरपर्यंत स्पर्धेसाठी चित्र व व्हिडिओ पाठवता येतील. 

-----------
चित्र व व्हिडिओ कुठे पाठवाल : 
eduvartanews@gmail.com या मेल आयडीवर व्हिडिओ व चित्र पाठवता येतील.अधिक माहितीसाठी 9309506368 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.  चित्र व व्हिडिओ पाठवताना : विद्यार्थ्यांचे नाव , शाळेचे नाव , वर्ग , आणि संपर्क क्रमांक पाठवावा.