वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान; शाळांच्या वेळा बदलण्याचे न्यायालयाचे आदेश

सध्या बंगळुरूतील वाहतुकीचा परिणाम शाळांवर होताना दिसत आहे. त्यामुळे बेंगळुरूमधील शाळांच्या वेळेत बदल होण्याची शक्यता आहे.

वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान; शाळांच्या वेळा बदलण्याचे न्यायालयाचे आदेश

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 'सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया' अशी ओळख असणाऱ्या बंगळुरू (Bengaluru) शहरावर  तिथल्या  वाहतूक कोंडीमुळे (Traffic Congestion) कायम टीका होत असते. आता तिथल्या वाहतूक कोंडीचा परिणाम मुलांच्या शाळांवर (Schools) होऊ लागला आहे. कोंडीमध्ये अडकल्यामुळे मुलांना वेळेत शाळेत पोहोचता येत नाही, त्यामुळे शहरातील सर्व शाळांच्या वेळा बदलाव्यात अशी सूचना कर्नाटक उच्च न्यायालयाकडून (Karnataka High Court) करण्यात आली आहे. 

 

सध्या बंगळुरूतील वाहतुकीचा परिणाम शाळांवर होताना दिसत आहे. त्यामुळे बेंगळुरूमधील शाळांच्या वेळेत बदल होण्याची शक्यता आहे. याबाबत शिक्षण विभाग शहरातील शाळांच्या वेळा सुधारण्याच्या विचारात आहे. या संदर्भात उद्या ५  ऑक्टोबरला शिक्षण विभाग खाजगी शाळा संघटना, शालेय वाहन संघटना आणि पालकांसोबत बैठक घेणार आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग शहरातील रस्त्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी शाळेची वेळ अर्धा ते एक तास आधी किंवा नंतर करण्याच्या विचारात आहे, अशी माहिती समोर येत आहे. 

भरती परीक्षांमधील पेपरफुटी, शुल्क वसुली, दत्तक शाळेसह अनेक प्रश्न थेट राज्यपाल दरबारी!

गेल्या महिन्यात एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना कर्नाटक उच्च न्यायालयाने हा मुद्दा उपस्थित केला होता. मुख्य न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित यांच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, "राज्य सरकारने वाहतूक कमी करण्यासाठी शाळेच्या वेळेत बदल करण्याबाबत चर्चा करण्यासाठी खासगी आणि सार्वजनिक संस्था, स्कूल बस ऑपरेटर आणि पालक संघटनांच्या प्रतिनिधींसह भागधारकांची बैठक बोलवावी."

 

मात्र, शाळेच्या वेळापत्रकात बदलाबाबत पालक आणि शाळा संघटनांकडून विरोध दर्शवण्यात येत आहे. सध्या, बंगळुरूमधील बहुतेक शाळा सकाळी ८.३० वाजता सुरू होतात, परंतु शिक्षण विभाग शाळांच्या वेळा ३० मिनिटे ते ६० मिनिटांपर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे. काही पालक संघटना शाळेच्या वेळा बदलण्याऐवजी रस्त्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी शाळांजवळील मोठ्या रहदारीच्या ठिकाणी अधिक पोलीस कर्मचारी तैनात करावेत, अशी मागणी करत आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k