‘लक्ष्मीनारायण’ विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरूपदी डॉ. राजू मानकर; राज्य शासनाचा आदेश

डॉ. राजू मानकर हे पुर्वीच्या लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेचे संचालक होते. आता त्यांचीच कुलगुरुपदी नियुक्ती झाली आहे.

‘लक्ष्मीनारायण’ विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरूपदी डॉ. राजू मानकर; राज्य शासनाचा आदेश

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा मिळालेल्या नागपूर येथील लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या (LITU) प्रथम कुलगुरूपदी डॉ. राजू मानकर (VC Dr Raju Mankar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून (Higher Education Department) याबाबतचा आदेश काढण्यात आला आहे.

 

डॉ. राजू मानकर हे पुर्वीच्या लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (LIT) या संस्थेचे संचालक होते. आता त्यांचीच कुलगुरुपदी नियुक्ती झाली आहे. ते विद्यापीठाच्या प्रथम कलुगुरू पदाचा पदभार ज्या दिनांकाला स्वीकारतील त्या दिनांकापासून एक वर्षाच्या कालावधीसाठी किंवा कुलपतींद्वारे कुलगुरूंची नियमित नियुक्ती केली जाईपर्यंत यापैकी जो अवधी अगोदर पूर्ण होईल तोपर्यंत त्यांची नियुक्ती राहील.

इयत्ता दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक बोर्डाकडून जाहीर

 

एलआयटीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठापासून विभक्त करून विद्यापीठात रुपांतर करण्यात आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचा (UGC) स्वायत्त दर्जा प्राप्त झाल्यानंतर लक्ष्मीनारायण तंत्र संस्थेला स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा देण्यासाठी पावसाळी अधिवेशनात याबाबतच्या विधेयकाला राज्याच्या विधानसभेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे एलआयटीला लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ ही ओळख प्राप्त झाली.

 

विद्यापीठाच्या नियामक मंडळाची रचनाही निश्चित करण्यात आली आहे. त्याप्रमाणे नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी रसायन तंत्रज्ञान संस्थेचे माजी कुलगुरु डॉ. गणपती यादव यांची नियुक्ती राज्य शासनाकडून करण्यात आली आहे. ही नियुक्ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी असेल. याबाबतचा आदेशही उच्च व तंत्र शिक्षण विभागाने बुधवारी काढला आहे.

 शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k