शाळांमध्ये शिक्षक अन् कर्मचाऱ्यांनाही मोबाईल वापरण्यास बंदी; दिल्ली सरकारचा आदेश

दिल्ली शिक्षण संचालनालयाने सर्व सरकारी, अनुदानित आणि खाजगी  शाळांना जारी केलेल्या परिपत्रकात शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना मोबाइल वापराबाबत महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.

शाळांमध्ये शिक्षक अन् कर्मचाऱ्यांनाही मोबाईल वापरण्यास बंदी; दिल्ली सरकारचा आदेश

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

अलीकडे प्रसिद्ध झालेल्या काही अहवालांमध्ये विद्यार्थ्यांकडून (Students) होणाऱ्या मोबाईल (Mobile) फोनच्या वापराचे दुष्परिणाम अधोरेखित करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आता फक्त विद्यार्थीच (Students) नव्हे तर शिक्षक (Teachers) आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवरही शैक्षणिक संकुलाच्या आवारात मोबाईल वापरावर निर्बंध आणण्यात आणले जात आहेत. या संदर्भात  दिल्ली सरकारने (Delhi Government) शाळांमध्ये मोबाइल वापरण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. 

दिल्ली शिक्षण संचालनालयाने सर्व सरकारी, अनुदानित आणि खाजगी  शाळांना जारी केलेल्या परिपत्रकात शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना मोबाइल वापराबाबत महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार  सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी शाळेच्या परिसरात शाळेच्या वेळेत मोबाईल फोन वापरू शकत नाहीत. याशिवाय संचालनालयाने  विद्यार्थ्यांसाठीही काही निर्देश दिले आहेत. त्यानुसार दिल्लीतील  सर्व सरकारी, अनुदानित आणि खाजगी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या परिसरात मोबाईल फोन वापरण्यास मनाई आहे.

अभ्यासासाठी मोबाईल नकोसा! ७५ टक्के विद्यार्थ्यांकडून केवळ मनोरंजनासाठीच वापर

कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही परिस्थितीत वर्गात मोबाईल वापरता येणार नाही. एखादा विद्यार्थी मोबाईल घेऊन शाळेत आला तर तो लॉकरमध्ये जमा करण्याची आणि शाळेच्या वेळेनंतर मोबाईल विद्यार्थ्यांना परत करण्याची व्यवस्था शाळा प्रशासनाला करावी लागणार आहे. तसेच  सर्व शाळांना हेल्पलाइन क्रमांकांची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, ज्याद्वारे पालक आणि विद्यार्थी आपत्कालीन परिस्थितीत एकमेकांशी संपर्क साधू शकतात.

संचालनालयाने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की, "आज मोबाईल हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे, मग तो विद्यार्थी असो, शिक्षक असो, व्यावसायिक असो किंवा इतर कोणीही असो. तथापि, त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही पैलू आहेत. मोबाईलच्या अतिवापरामुळे नैराश्य, चिंता, एकटेपणा, अति उत्साह, खराब झोप आणि खराब दृष्टी समस्या आज सामान्य झाल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे शाळेतील अध्यापन प्रक्रियेवरही परिणाम होत आहे. तसेच वर्गात मोबाईलच्या वापरामुळे चुकीच्या फोटोग्राफी, व्हिडिओग्राफीची प्रकरणेही समोर आली आहेत."

SPPU News : विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूंची नियुक्ती महिना अखेरीस?

दरम्यान, संयुक्त राष्ट्रांची शिक्षण विज्ञान आणि सांस्कृतिक संस्था असलेल्या युनेस्कोच्या "ग्लोबल एज्युकेशन मॉनिटिरग रिपोर्ट' या अहवालात मुलांकडून लहान वयापासून होत असलेल्या स्मार्टफोन वापरावर चिंता व्यक्त करण्यात आली होती. तर डेव्हलपमेंट इंटेलिजेंस युनिट (DIU) ने केलेल्या पॅन-इंडिया सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, भारतात ग्रामीण भागातील सुमारे ७० टक्के विद्यार्थी स्मार्टफोनचा वापर अभ्यासासाठी न करता मनोरंजनासाठी करत आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo