Breaking News : त्या हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचले 

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या  N +2 च्या निर्णयामुळे परीक्षा देऊ न शकणाऱ्या सुमारे ३० ते ३२ विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होऊ शकतो.

Breaking News : त्या हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचले 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 केवळ सत्र पूर्तता संपल्यामुळे (N+2) परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University) दोन अतिरिक्त परीक्षांना बसण्याची शेवटची संधी (students a last chance to appear for two additional exams) देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमध्ये हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचणार (The academic year of thousands of students will be saved) आहे. या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज लवकरच भरून घेतले जाणार असून त्यांची परीक्षा स्वतंत्रपणे घेण्यात येणार आहे.

हेही वाचा : शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी संघटनांमध्ये राडा... व्हिडिओ व्हायरल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. परंतु, विद्यापीठ प्रशासनाने त्यावर मार्ग काढला आहे. अंतिम पूर्व व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दोन परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या  N +2 च्या निर्णयामुळे परीक्षा देऊ न शकणाऱ्या सुमारे ३० ते ३२ विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होऊ शकतो,असे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या २०१९ च्या परिपत्रकामुळे काहीसा गोंधळ निर्माण झाला होता. अनेक विद्यार्थ्यांची परीक्षेची संधी 'पीआरएन ब्लॉक' केल्यामुळे जाणार होती. त्यामुळे अनेक विद्यार्थी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांची संवाद साधत होते.तसेच आमचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्यापासून वाचवावे, अशी मागणी करत होते. त्यावर विद्यापीठ प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेत अंतिम पूर्व व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दोन संधी उपलब्ध करून देण्याचे परिपत्रक प्रसिद्ध केले.

सत्र पूर्तता संपलेल्या विद्यार्थ्यांना एका शैक्षणिक वर्षासाठी परीक्षेस बसण्याची परवानगी देण्याबाबतचे पत्र विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाने  उपकुलसचिव  मुंजाजी रासवे यांनी प्रसिद्ध केले आहे. परीक्षा मंडळाने सादर केलेल्या आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांनी मान्यता दिलेल्या आराखड्यानुसार पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना अपवादात्मक स्थिती विचारात घेता,  यापुढे दोन परीक्षांना बसण्याची शेवटची विशेष संधी देण्यास मान्यता देण्यात येत आहे, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

या परिपत्रकात कोणत्या शैक्षणिक वर्षापासूनच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे, याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. परंतु, २०१३-१४ पासूनच्या अंतिम पूर्व व अंतिम वर्षात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दोन संधी मिळणार आहेत. त्यामुळे पारंपरिक अभ्यासक्रमाच्या एस. वाय, टी वाय , च्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शेवटच्या दोन वर्षाच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येईल, असे विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
-----------------------
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम पूर्व व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये ; या हेतूने विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा हजारो विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यामुळे काही कारणांमुळे परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी या शेवटच्या दोन संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.महेश काकडे यांनी केले आहे.