आंतरजिल्हा बदल्या केल्याशिवाय शिक्षक भरती नको! विधानसभेत आमदारांची मागणी

भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून बदल्यांकडे लक्ष वेधले.

आंतरजिल्हा बदल्या केल्याशिवाय शिक्षक भरती नको! विधानसभेत आमदारांची मागणी
Teachers Recruitment in Maharashtra

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यात तीस हजार शिक्षकांची भरती (Teachers Recruitment) केली जाणार आहे. पण त्याआधीर शालेय शिक्षण विभागाने (School Education Department) शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीवर बंदी आणली आहे. जुन्या शिक्षकांना बदली जिल्हा निवडण्याची एकमेव व शेवटची संधी दिली जाणार असल्याचे महिनाभरापुर्वी स्पष्ट करण्यात आले होते. अनेक शिक्षकांची आंतरजिल्हा बदलीची (Teachers Transfer) मागणी असल्याने आधी या बदल्या कराव्यात, मगच नवीन शिक्षक भरती करण्याची मागणी बुधवारी विधानसभेत करण्यात आली. (Maharashtra Assembly)

भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून बदल्यांकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, नवीन शिक्षक भरती करण्यापुर्वी आंतरजिल्हा बदल्या कराव्यात. अनेक वर्षांपासून पती-पत्नी वेगवेगळ्या जिल्ह्यात आहेत. त्यामध्ये दिव्यांगांचाही समावेश आहे. त्यामुळे आधी त्यांच्या बदल्या कराव्यात, असे पवार यांनी सांगितले.

शुल्क भरले नाही म्हणून सुमारे १०० विद्यार्थ्यांना शाळेने ठेवले डांबून

दरम्यान, राज्य सरकारने मागील महिन्यात आंतरजिल्हा बदली बंदीबाबत शासन निर्णय जाहीर केला होता. जुन्या शिक्षकांपैकी बदली इच्छूक शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीची एकच संधी दिली जाणार, असे म्हटले होते. ज्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची २०२२ मधील कार्यवाही पूर्ण झाली आहे, मात्र विनंती बदली मिळालेली नाही, त्या शिक्षकांना प्रतिक्षायादी प्रमाणे नियुक्ती दिली जाणार असल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

नव्याने भरती होणाऱ्या शिक्षकांना मात्र आंतरजिल्हा बदली मिळणार नाही. या शिक्षकांना अशी बदली हवी असल्यास राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यांना पुन्हा नव्याने भरतीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. शिक्षण विभागाने याबाबत ग्रामविकास विभागाने सुधारणा करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD