परिस्थितीनुसार राज्यातील शाळांना सुट्टी द्यावी ; शिक्षण आयुक्तांचे जिल्हाधिका-यांना पत्र

इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना सुट्ट्या देण्याबाबत निर्णय घ्यावा, असे पत्र राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे.

परिस्थितीनुसार राज्यातील शाळांना सुट्टी द्यावी ; शिक्षण आयुक्तांचे जिल्हाधिका-यांना पत्र

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

हवामान विभागाने (Department of Meteorology) )राज्यात अतिवृष्टीचा इशारा (Heavy rain warning) दिला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी (District Collector) आपापल्या जिल्ह्यातील पावसाची स्थिती पाहून इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना (Schools from 1st to 12th) सुट्ट्या देण्याबाबत निर्णय घ्यावा, असे पत्र राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे (suraj mandhare  Education Commissioner) यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे.

हेही वाचा : EduVarta Impact : बालभारतीच्या डोमेन विक्रीचा मुद्दा थेट विधानसभेत, वर्षा गायकवाड आक्रमक

गेल्या दोन दिवसापासून राज्यभर अनेक ठिकाणी पावसाचे प्रमाण वाढलेल आहे. काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच आता हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्याअनुषंगाने शिक्षण आयुक्तालय यांनी शाळांबाबत खबरदारीचे पाऊल उचले आहे. पावसामुळे मुलांची शाळेत जाण्या-येण्याची गैरसोय होते. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळांना उद्देशून शिक्षण विभागाकडून सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्या जिल्ह्यातील पावसाची स्थिती पाहून शाळेला सुट्टी देण्याबाबत निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबई, रायगड जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील इतर भागात देखील सुट्टीबाबत निर्णय घेण्यासंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळवले आहे.