नवव्या वर्षी दहावी अन् २१ व्या वर्षी पीएच.डी. झालेला तथागत चार वर्षांपासून बेरोजगार

तथागत अवतार तुलसी हे बिहारमधील पाटणा येथील रहिवासी आहे. १९८७ मध्ये जन्मलेला तथागत अवतार तुलसी २०१० आयआयटी मुंबईमध्ये सहाय्यक प्राध्यापक झाले.

नवव्या वर्षी दहावी अन् २१ व्या वर्षी पीएच.डी. झालेला तथागत चार वर्षांपासून बेरोजगार
Tathagat Avatar Tulsi

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

वयाच्या नवव्या वर्षी दहावी अन् २१ व्या वर्षी पीएच.डी. पूर्ण करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness Book of World Record) दोनदा नाव समाविष्ट झालेला तथागत अवतार तुलसी (Tathagat Avatar Tulsi) हा तरूण मागील चार वर्षांपासून बेरोजगार आहे. वयाच्या २२ व्या वर्षी आपल्या हुशारीवर आयआयटी मुंबईमध्ये (IIT Bombay) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) झाला. मात्र, आजारपणामुळे संस्थेने त्याला २०१९ मध्ये कामावरून कमी केले. त्यानंतर आतापर्यंत तथागत बेरोजगार असून सध्या सध्या विधी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे.

तथागत अवतार तुलसी हे बिहारमधील पाटणा येथील रहिवासी आहे. १९८७ मध्ये जन्मलेला तथागत अवतार तुलसी २०१० आयआयटी मुंबईमध्ये सहाय्यक प्राध्यापक झाले. नवव्या वर्षी दहावी, अकराव्या वर्षी बीएससी आणि पुढचे पद्व्युत्तर शिक्षण केवळ एका वर्षात पूर्ण करून तथागत यांनी विक्रम केला आहे. एकविसाव्या वर्षी पीएचडी पूर्ण केलेला तथागतवर मुंबई आयआयटीची नतर पडली अन् लगेचच प्राध्यापक पदाची नोकरी दिली. शालेय जीवनापासूनच त्यांना भौतिकशास्त्रात प्रचंड रुची आहे.

विद्यार्थी, शिक्षकांसाठी ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’; चाळीस जणांना मिळतात ६० हजार रुपये

मुंबई पाऊल ठेवल्यानंतर मात्र वर्षभरातच म्हणजे २०११ मध्ये त्यांना खूप ताप आला. मुंबईचे हवामान त्यांना मानवले नाही. त्यानंतर त्यांना ऍलर्जी, अंगदुखी, ताप अशा तक्रारी जाणवू लागल्या. कसे तरी ते आणखी दोन वर्षे मुंबईत राहिले. पण त्यांच्या तब्येतीच्या समस्या वाढू लागल्या, म्हणून त्यांनी आयआयटी मुंबई मधून चार वर्षांची रजा घेतली आणि २०१३ मध्ये मुंबई शहर सोडले. तेव्हापासून ते पाटण्यात आहे. डिसेंबर २०१७ मध्ये चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते अॅलर्जीमुळे मुंबईला गेले नाहीत. अखेर त्यांना जुलै २०१९ मध्ये नोकरीवरून काढून टाकण्यात आले.

आता पुन्हा नोकरीसाठी लढा

नोकरी परत मिळवण्यासाठी त्यांना कायद्याची मदत घ्यायची आहे. त्यासाठी ते स्वतः कायद्याचे शिक्षण घेत आहेत. त्यांना 'व्हर्च्युअल ट्रान्सफर'चा मार्ग सापडला आहे. आता यातून ते दिल्ली उच्च न्यायालयात न्याय मागण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी इतर आयआयटीमध्ये बदलीसाठी आयआयटी मुंबईमध्ये अर्ज केला होता. मात्र त्यांना त्यासाठी मान्यता मिळाली नाही. तब्येतीमुळे त्यांच्या कारकिर्दीला मोठा ब्रेक लागला आहे.

वयाच्या पाचव्या वर्षापासून प्रसिद्धीच्या झोतात आलेले तथागत अवतार तुलसी आता फार कमी लोकांना भेटतात. लहानपणापासून भौतिकशास्त्राचा सराव करणारे तथागत आजकाल कायद्याच्या पुस्तकात रमून जातात. पण आपण बेरोजगार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हातात सध्या नोकरी नसली तरी गेलेली नोकरी परत मिळविण्यासाठी हा लढा सुरू असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. असे असले तरी आपल्या हुशारीने जगाला अवाक करणारा भौतिकशास्त्रज्ञ सध्या बेरोजगार आहे, हेच सत्य आहे.  

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo