‘मेरी माटी मेरा देश’च्या जागतिक विक्रमासाठी महाविद्यालयांवर मोठी जबाबदारी

राज्य सरकारकडून सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांना याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. त्याबाबत वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

‘मेरी माटी मेरा देश’च्या जागतिक विक्रमासाठी महाविद्यालयांवर मोठी जबाबदारी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘मेरी माटी मेरा देश’ (Meri Mati Mera Desh) ही मोहिम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्व महाविद्यालयांमधून अमृत कलशामध्ये माती संकलित करून मुंबईत (Mumbai) एकत्रित केली जाणार आहे. या मोहिमेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinnes World Records) नोंद केली जाणार आहे. त्यासाठी सर्व महाविद्यालयांवर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

 

राज्य सरकारकडून सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांना याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. त्याबाबत वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी दि. २१ सप्टेंबरपर्यंत एक मूठ माती गोळा करून हातात माती घेऊन ती अमृत कलशामध्ये टाकतानाचा सेल्फी काढावा व तो लिंकवर अपलोड करावा, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

 

विद्यापीठात गणेशोत्सव साजरा करण्यावरून भाजप आमदाराची थेट कुलगुरूंना धमकी

दि. ३ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत प्रत्येक महाविद्यालयात किमान ७५ रोपांची अमृत वाटीका/अमृत वन/अमृत कोपरा/अमृत कुंडी/अमृत गार्डन तयार करण्यास सांगितले आहे. तर संकलित केलेल्या मातीचा एक कलश तालुक्याच्या एका महाविद्यालयात दि. १४ ते २० ऑक्टोबर दरम्यान जमा करायचे आहेत.

 

त्यानंतर तालुक्यातील सर्व महाविद्यांमधून आलेल्या कलशातील माती एकत्रित करून तालुक्याचा एक कलश असे महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांचा प्रत्येकी एक कलश दि. २८ व २९ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे एकत्रित करण्यात येणार आहेत.

 

‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमाची गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे. उपक्रम यशस्वीपणे राबवून त्याबाबतचा प्रगती अहवाल दर शुक्रवारी शासनास सादर करावा, अशा सुचना मंत्रालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. रामेश्वर कोठावळे यांनी सर्व विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांना दिल्या आहेत.   

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j