पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान/वास्तुकला अभ्यासक्रम प्रवेशाची प्रवेश प्रक्रिया सुरू

तीन वर्ष कालावधीच्या पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान / वास्तुकला अभ्यासक्रम राबविणाऱ्या राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित व खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर.  

पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान/वास्तुकला अभ्यासक्रम प्रवेशाची प्रवेश प्रक्रिया सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

तंत्रशिक्षण संचालनालय विभागाने (Department of Directorate of Technical Education) शैक्षणिक वर्ष २०२४-२५ (Academic year 2024-25) करिता प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान/वास्तुकला अभ्यासक्रम (First Year Diploma Engineering and Technology/Architecture Course) प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर (Schedule announced) केले आहे. तीन वर्ष कालावधीच्या पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान / वास्तुकला अभ्यासक्रम राबविणाऱ्या राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित व खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी करणे आणि अर्ज निश्चित करणे या प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 

प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवारांना २९ मे ते २५ जून दरम्यान अधिकृत संकेतस्थळावर अर्ज नोंदणी करता येणार आहे. याच कालावधीत कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. येत्या २७ जून रोजी उमेदवारांसाठी संकेतस्थळावर तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रदर्शित करण्यात येणार आहेत. तात्पुरत्या गुणवत्ता यादीमध्ये उमेदवारांना काही तक्रार असल्यास त्यांना २८ ते ३० जून यादरम्यान हरकती सादर करता येतील. तर २ जुलै रोजी उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाणार आहे. 

भारताचा नागरीक असणाऱ्या आणि किमान ३५ टक्के एवढ्या गुणांसह इयत्ता १० वी उत्तीर्ण असणारे सर्व उमेदवार यासाठी पात्र असणार आहेत. उमेदवारांना वेळापत्रकानुसार https://poly24.dtemaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा लागणार आहे. राज्याबाहेर सर्व उमेदवार आणि राज्यातील सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना ४०० रुपये अर्ज शुल्क आकरण्यात येणार आहे. तर इतर सर्व प्रवर्गासाठी ३०० अर्ज शुल्क असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरावा लागणार आहे. 

इच्छुक उमेदवारांनी माहिती पुस्तिकेमध्ये दिलेले नियम, प्रक्रिया आणि सूचना यांचे काळजीपूर्वक वाचन करावे. माहिती पुस्तिका https://poly24.dtemaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर डाउनलोड करण्यासाठी प्रसिद्ध केली आहे.