अण्णासाहेब मगर महाविद्यालयात  राष्ट्रीय मतदार दिन साजरा साजरा

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात  राष्ट्रीय मतदार दिन साजरा साजरा


विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया, मतदान याविषयीची माहिती व्हावी आणि जाणीव जागृती या उद्देशाने राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयात मतदान शपथ तसेच मतदान जागृती दालनाचे उद्घाटन करण्यात आले. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार श्री राजेश कानसकर उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी  प्रा. अनिल जगताप राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ. सविता कुलकर्णी, प्रा. नितीन लगड प्रा. गौरव शेलार तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक उपस्थित होते.
        कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.  सविता कुलकर्णी यांनी या दिवसाचे महत्व आणि विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी करण्यासाठी सहभाग घ्यावा असे मत मांडले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भारत हा मोठा लोकशाही असलेला देश असून मतदान हा त्याचा पाया आहे. आपल्याला उत्तम नेतृत्व हवे असेल तर त्यासाठी मतदान आणि मतदान प्रक्रिया सहभाग ही महत्त्वाची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. भारतात अजूनही मतदानाकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. विद्यार्थ्यांनी याचा विचार करावा, ज्यांनी सतरा वर्षे सहा महिने पूर्ण केले आहेत त्यांनी नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी केले. यानंतर श्री राजेश कानस्कर यांनी विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मतदार दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच मतदान जागृती झालं दालन ही चांगली कल्पना असून त्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार आपण महाविद्यालयात नोंदणी शिबिर आयोजित करू शकतो असे त्यांनी यावेळी सांगितले. यानंतर श्री राजेश कानसकर यांच्या हस्ते मतदान जागृती दालनाचे उद्घाटन करण्यात आले तसेच आय वोट  यावर आपल्या हाताच्या ठशाने आणि सहीने संमती दर्शविण्यात  आली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. नितीन लगड यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन उपप्राचार्य डॉक्टर शुभांगी औटी प्रा. अनिल जगताप, डॉ. सविता कुलकर्णी प्रा. नितीन लगड, प्रा. गौरव शेलार यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.