सैन्य दलातील भरतीसाठी मोफत प्रशिक्षण; असा करा ऑनलाईन अर्ज

कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात येणार आहे.

सैन्य दलातील भरतीसाठी मोफत प्रशिक्षण; असा करा ऑनलाईन अर्ज

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

Combined Defence Services Exam: भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये (Army, Navy and Air Force)अधिकारी पदावर भरतीसाठी होणाऱ्या कंम्बाइंड डिफेन्स सर्व्हीसेस (सीडीएस) परीक्षेची (Combined Defense Services (CDS) Exam)पूर्वतयारी करून घेतली जाणार आहे.त्यासाठी महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता नाशिक जिल्ह्यात छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड येथे १० जून  ते २३ ऑगस्ट  २०२४  या कालावधीत सीडीएस कोर्स क्रमांक ६३ चे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांना येत्या ४ जून २०२४ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून (District Soldiers Welfare Offices)करण्यात आले आहे.

या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय (Free training facility)करण्यात येणार आहे. मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेल्फेअर, पुणे (डीएसडब्लू) यांच्या https://mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सर्च करुन त्यामधील सीडीएस ६3 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट पूर्ण भरून तीन प्रतीत सोबत घेऊन यावी.

कंम्बाइंड डिफेन्स सर्व्हीसेस परीक्षेच्या पूर्व तयारी कोर्ससाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. उमेदवाराने केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या सीडीएस परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज केलेला असावा.

अधिक माहीतीसाठी उमेदवारांनी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र , नाशिक रोड, नाशिक ई-मेल आयडी training.pctcnashik@gmail.com दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२ तसेच भ्रमणध्वनी क्रमांक ९१५६०७३३०६ येथे संपर्क साधावा, असे आवाहन  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, लेफ्टनंट कर्नल स.दै. हंगे (नि.) यांनी केले आहे.