पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ४ सप्टेंबरपासून अकारावीत प्रवेश

विद्यार्थ्यांना पाचव्या फेरीतून येत्या ४ ते ८ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन नोंदणी करणे ,अर्ज भरणे,अर्ज एडिट करणे,कागदपत्रांची तपासणी करणे,महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरणे आदी प्रवेशाशी निगडित प्रक्रिया पूर्ण करता येईल.

पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ४ सप्टेंबरपासून अकारावीत प्रवेश

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ( 11th Admission ) ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात असून इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी (For students who have passed the 10th supplementary examination) पाचवी विशेष फेरी (Fifth special round) आयोजित करण्यात आली आहे.

हेही वाचा : शिक्षण नवव्या वर्षी दहावी अन् २१ व्या वर्षी पीएच.डी. झालेला तथागत चार वर्षांपासून बेरोजगार

विद्यार्थ्यांना पाचव्या फेरीतून येत्या ४ ते ८ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन नोंदणी करणे ,अर्ज भरणे,अर्ज एडिट करणे,कागदपत्रांची तपासणी करणे,महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरणे आदी प्रवेशाशी निगडित प्रक्रिया पूर्ण करता येईल.

पुणे व पिंपरी महापालिका कार्यक्षत्रातील प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे.राज्यातील इतरही काही महापालिकांमध्ये सुध्दा आकारावीचे प्रवेश ऑनालाईनच केले जात आहेत.आत्तापर्यंत प्रवेशाच्या चार विशेष फे-या घेण्यात आल्या आहेत.इयत्ता दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.त्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पाचवी विशेष फेरी राबवली जात आहे.त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे.  

अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरून पासतीक्रम नोंदवणा-या आणि प्रवेशास पात्र ठरणा-या विद्यार्थ्यांचा डाटा जमा केला जाईल. येत्या ८ सप्टेंबर नंतर 9 व 10 सप्टेंबर हा कालावधी शिक्षण विभागाकडून डाटा प्रोसेसिंगसाठी राखीव ठेवला गेला आहे.त्यानंतर विद्यार्थ्यांना मिळालेले गुण आणि त्यांनी नोंदवलेले पसंतीक्रम यानुसार येत्या ११ सप्टेंबर रोजी प्रवेशाची यादी प्रसिद्ध केली जाईल. विद्यार्थ्यांना कॅप अंतर्गत ११ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या कालावधीत मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेता येईल. तसेच इन हाऊस कोटा, मायनॉरिटी आणि बायफोकलचे प्रवेश सुद्धा याच वेळेत केले जाणार आहेत, असे शिक्षण विभागातील अधिका-यांनी सांगितले.