इंजिनिअरिंग,फार्मसी प्रवेश अर्ज भरला का?

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर २०२३ च्या प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी सीईटी सेलच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरता येईल.

इंजिनिअरिंग,फार्मसी प्रवेश अर्ज भरला का?

  इंजिनिअरिंग, फार्मसी, एग्रीकल्चर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (cet call) घेतल्या जाणाऱ्या प्रवेश पूर्व परीक्षेसाठी अर्ज भरण्यास आजपासून (दि. ८) सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांना ७ एप्रिलपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत.

       सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य शासनातर्फे प्रवेश पूर्व परीक्षा घेतले जाते. इंजीनियरिंग, फार्मसी, एग्रीकल्चर अभ्यासक्रमास सीईटीच्या माध्यमातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मागील वर्षी ६ लाख ५ हजार ९४४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील ४ लाख ६७ हजार ३७९ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. तब्बल १ लाख ३८ हजार ५६५ विद्यार्थी अर्ज भरूनही परीक्षेला बसले नाहीत. गेल्या वर्षी पीसीएम ग्रुपसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २ लाख ८२ हजार ७० एवढी होती. तर पीसीबीग्रुप साठी ३ लाख २३ हजार ८७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

     राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर २०२३ च्या प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी सीईटी सेलच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरता येईल.

------------------------

राखीव गटातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी

एमएचटी- सीईटी - २०२२ या परीक्षेत पीसीएम आणि पीसीबी ग्रुप घेऊन परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती.

खुल्या संवर्गाचे १ लाख ८० हजार ९६ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते. तर राखीव गटातील २ लाख ८७ हजार २८३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

    ------------