विद्यापीठाची 111 जागांची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध ; आजपासूनच भरा अर्ज, पहा कोणत्या संवर्गासाठी किती जागा

प्रोफेसर पदाच्या 32 जागा, असोसिएट प्रोफेसर पदाच्या 32 जागा आणि असिस्टंट प्रोफेसर पदाच्या 47 जागा भरल्या जाणार आहेत.

विद्यापीठाची 111 जागांची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध ; आजपासूनच  भरा अर्ज, पहा कोणत्या संवर्गासाठी किती जागा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) विविध विभागातील 111 रिक्त शिक्षकी पदांच्या भरतीची (Recruitment of 111 vacant teaching posts) सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झाली असून १ जानेवारीपासून पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. त्यात प्रोफेसर पदाच्या 32 जागा, असोसिएट प्रोफेसर पदाच्या 32 जागा आणि असिस्टंट प्रोफेसर पदाच्या 47 जागा भरल्या जाणार आहेत. विद्यापीठाच्या recruitment.unipune.ac.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 

असिस्टंट प्रोफेसर पदासाठी 47 जागा उपलब्ध असल्या तरी त्यातील १५ जागा खुल्या प्रवर्गासाठी , 15 जागा ओबीसी संवर्गासाठी , ५ जागा ईडब्ल्यूएस संवर्गासाठी,  ४ जागा एसटी संवर्गासाठी,  ३ जागा डी.टी-ए संवर्गासाठी, 2  जागा एन टी-सी संवर्गासाठी  तर प्रत्येकी 1  जागा एससी, एनटीसी आणि एसबीसी संवर्गासाठी आहे.

हेही वाचा : विद्यापीठाची पीएच.डी प्रवेश पूर्व परीक्षा (पेट) फेब्रुवारी महिन्यात

असिस्टंट प्रोफेसर पदाप्रमाणेच प्रोफेसर व असोसिएट प्रोफेसर पदासाठी सुद्धा संवर्गनिहाय उपलब्ध जागांची माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे संबंधित पदासाठीची पात्रता व इतर आवश्यक माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे. खुल्या संवर्गातील उमेदवारांकडून अर्जासाठी 1 हजार रुपये तर आरक्षित  संवर्गासाठी 500 रुपये ऑनलाइन शुल्क आकारले जाणार आहेत.

-----------------

महत्त्वाचे मुद्दे 

प्रोफेसर पदाच्या  एकूण  जागा : 32 

असोसिएट प्रोफेसर पदाच्या  एकूण  जागा : 32 

असिस्टंट प्रोफेसर पदाच्या  एकूण  जागा : 47

अर्ज करण्याचा कालावधी : 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 

अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ : recruitment.unipune.ac.in