CBSE कडून विद्यार्थी आणि पालकांचे आजपासून मानसशास्त्रीय समुपदेशन 

 CBSE ने  1800-11-8004 हा टोलफ्री क्रमांकही उपलब्ध करून दिला आहे.

CBSE कडून विद्यार्थी आणि पालकांचे आजपासून मानसशास्त्रीय समुपदेशन 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) ने  १ जानेवारी २०२४ पासून मानसशास्त्रीय समुपदेशनाची सुविधा सुरू केली आहे.  यंदाच्या CBSE बोर्डाच्या १० वी आणि १२वीच्या परीक्षेला (10th and 12th Exams)प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना ही सुविधा मिळणार आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनकडून ही सुविधा परीक्षेपूर्वी सुरू करण्यात आली असून निकाल जाहीर झाल्यानंतर सुध्दा हे समुपदेशन पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. दोन्ही वेळा उमेदवार त्याचा लाभ घेऊ शकतात. सीबीएसईची टेलिसमुपदेशनाची सुविधा देखील सुरु आहे.  CBSE ने वैयक्तिक मार्गदर्शनासाठी ६५ समुपदेशक, विशेष शिक्षक आणि मुख्याध्यापकांची नियुक्ती केली आहे. सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत विद्यार्थी आणि पालक फोनवर संपर्क साधू शकतात.

हेही वाचा : जिल्हा परिषदेसह अनुदानित व सेल्फ फायनान्सच्या 24 शाळा पडल्या बंद

याशिवाय  CBSE ने  1800-11-8004 हा टोलफ्री क्रमांकही उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावर  वारंवार विचारले जाणारे प्रश्न, तणावमुक्त परीक्षेच्या तयारीच्या टिप्स, वेळ आणि तणाव व्यवस्थापन अशा अनेक विषयांवर माहिती मिळेल. ही सुविधा हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये असेल. तसेच  सीबीएसई त्यांच्या वेबसाइटवर पॉडकास्ट देखील प्रसारित करेल. उमेदवार तेथूनही तणावमुक्त राहण्याच्या टिप्स शिकू शकतात. परीक्षेच्या तयारीपासून व  तणावापासून दूर राहण्यापर्यंतच्या अनेक विषयांवर येथे पॉडकास्ट उपलब्ध असतील.