आरोग्यविज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा मंगळवारपासून; दीड महिन्यांचे वेळापत्रक

राज्यातील विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालयातील एकूण १७१ परीक्षाकेंद्रावर दि. २७ जून ते दि. ९ ऑगस्ट या कालावधीत विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत.

आरोग्यविज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा मंगळवारपासून; दीड महिन्यांचे वेळापत्रक
MUHS, Nashik

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (MUHS) पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्याक्रमांच्या उन्हाळी सत्रातील परीक्षेच्या तिसऱ्या टप्प्यास मंगळवारपासून (दि. २७ जून) सुरूवात होत आहे. या परीक्षा दि. ९ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी दिली. (MUHS Examinations)

राज्यातील विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालयातील एकूण १७१ परीक्षाकेंद्रावर दि. २७ जून ते दि. ९ ऑगस्ट या कालावधीत विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. यामध्ये एम.बी.बी.एस., बी.डी.एस. बी.ए.एम.एस., बी.यु.एम.एस., बी.एच.एम.एस., बी.एस्सी. नर्सिंग, बेसिक बी.एस्सी नर्सिंग, बी.पी.टी.एच., बी.ओ.टी.एच., बी.पी.ओ., बी.ए.एस.एल.पी. हे पदवी अभ्यासक्रम आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अटल रँकिंगमधून बाहेर

पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमातील एम.डी.एस., डिप्लोमा डेन्टेस्ट्री, एम.डी./एम.एस, आयुर्वेदा आणि युनानी, एम.डी. होमिओपॅथी, डिप्लोमा आयुर्वेदा,  एम.ओ.टी.एच., एम.ए.एस.एल.पी., एम.एस्सी., एम.पी.ओ तसेच बी.पी.एम.टी., एम.पी.एच., एम.बी.ए., एम.फिल., बी. ऑप्टोमेट्री, डिप्लोमा ऑप्टोमेट्री, डिप्लोमा ऑप्थॉल्मीक, डिप्लोमा पॅरामेडिकल, पी.जी. डि.एम.एल.टी., सी.सी.एम.पी., एम.एम.एस.पी.सी. या अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार आहेत.

दि. 29 जून रोजी होणाऱ्या परीक्षा बकरी ईदची सार्वजनिक सुट्टी असल्याने सर्व परीक्षा दि. ३० जून रोजी घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी स्पष्ट केले. याबाबतीत अडचणी किंवा सूचना असल्यास विद्यार्थ्यांनी केंद्र समन्वयकांशी संपर्क साधावा अथवा विद्यापीठाचे अधिकृत www.muhs.ac.in संकेतस्थळावर परीक्षासंदर्भात माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2