राज्यातील शाळांना आजपासून सुट्टी : उष्णता वाढल्याने निर्णय

शाळांना २१ एप्रिलपासून सुट्टी सुरू होऊन ती १५ जूनपर्यंत असणार आहे. विदर्भातील उष्णतेची तीव्रता लक्षात घेता विदर्भातील शाळा या ३० जून पर्यंत बंद राहतील, असे राज्य शासनाने जाहीर केले आहे. 

राज्यातील  शाळांना आजपासून सुट्टी : उष्णता वाढल्याने निर्णय
Holiday for state board schools

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क/ पुणे

राज्यात मागील काही दिवसांपासून तापमानात अचानक वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे, या पार्शवभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने (state board schools) महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य मंडळच्या सर्व शाळांमध्ये आजपासून (दि.२१) उन्हाळी सुट्टी (Holiday ) देण्याचे आदेश काढले आहेत. तसेच राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा, असे आदेश देण्यात आले आहेत.

वाढत्या उष्णतेच्या लाटांच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य मंडळाच्या बहुतेक शाळांची परीक्षा संपली आहे. त्यामुळे या शाळांना सुट्टी लागली आहे. परंतु परीक्षा नंतरही काही शाळा सुरू असतील तर या शाळांना २१ एप्रिलपासून सुट्टी सुरू होऊन ती १५ जूनपर्यंत असणार आहे. विदर्भातील उष्णतेची तीव्रता लक्षात घेता विदर्भातील शाळा या ३० जून पर्यंत बंद राहतील, असे राज्य शासनाने जाहीर केले आहे. 

पालक संभ्रमात

राज्यशासनाने आज पासून शाळांना सुट्टी देण्याचे आदेश जारी केले असले तरी त्या संदर्भात अद्याप शाळांकडून निरोप आलेला नसल्यामुळे पालक संभ्रमावस्थेत आहेत. आज सकाळी पाल्याना शाळेत पाठवावे कि नाही याबद्दल पालकांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.