बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापकांची कंत्राटी भरती; पावणे दोन लाख रुपये मानधन

महाविद्यालयातील रुग्णसेवा तसेच शैक्षणिक कार्यक्रमांसाठी चिकित्सालयीन तसेच अतिवशेषोपचार विभागातील विविध विषयांतील प्राध्यापक सहयोगी प्राध्यापकांची पदे भरली जाणार आहेत.

बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापकांची कंत्राटी भरती; पावणे दोन लाख रुपये मानधन
B.J. Government Medical College

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुण्याती बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (B. J. Government Medical College) विविध विषयांतील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापकांची १८ पदे कंत्राटी पध्दतीने भरली (Professor Recruitment) जाणार आहेत. त्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. सेवानिवृत्त अध्यापकांची नियुक्ती झाल्यास त्यांना दरमहा सुमारे पावणे दोन लाख रुपये मानधन दिले जाणार आहे. तसेच बिगर सेवानिवृत्त गटातून कंत्राटी पध्दतीने नियुक्त होणाऱ्या अध्यापकांची नंतरच्या काळात नियमित नियुक्तीही होऊ शकते, असे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. (Maharashtra Government Contractual Recruitment)

 

महाविद्यालयातील रुग्णसेवा तसेच शैक्षणिक कार्यक्रमांसाठी चिकित्सालयीन तसेच अतिवशेषोपचार विभागातील विविध विषयांतील प्राध्यापक सहयोगी प्राध्यापकांची पदे भरली जाणार आहेत. त्यामध्ये मनोविकृतीशास्त्र व बधिरीकरणशास्त्र विभागासाठी प्रत्येकी एक अशी दोन प्राध्यापकांची पदे आहेत. तर सहयोगी प्राध्यापकांची सोळा पदे भरली जाणार आहेत.

‘महानिर्मिती’चा फुटलेला पेपरच केला जगजाहीर; आता SIT चौकशी होणार का?

 

सहयोगी प्राध्यापकांमध्ये बधिरीकरणशास्त्र विषयाचे पाच, क्ष-किरणशास्त्र विषयाचे दोन आणि स्त्री रोग व प्रसुतीशास्त्र, कान-नाक व घसाशास्त्र, शल्यचिकित्साशास्त्र, औषध वैद्यकशास्त्र, अस्थि व्यंगोपचारशास्त्र  व क्षयरोग या सहा विभागांची प्रत्येकी एक तर नेत्र शल्यचिकित्साशास्त्र विषयाची तीन पदे भरली जाणार आहेत. सेवानिवृत्त अध्यापकांकडूनही अर्ज मागविण्यात आले आहेत.

 

उमेदवाराचे वय नियुक्तीवेळी कमाल ६९ वर्षापेक्षा जास्त नसावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक यांना करार पध्दतीने नियुक्तीसाठी त्या-त्या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या अध्यापकांबरोबरच कोणत्याही वयोगटाचे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने विहीत केलेली आवश्यक अर्हता धारण करणारे खाजगी व अन्य क्षेत्रातील उमेदवार (बिगर सेवानिवृत्त) पात्र असतील, असेही जाहिरातीत नमद करण्यात आले आहे.

 

सेवानिवृत्त अध्यापकांची करार पध्दतीने नियुक्ती झाल्यास प्राध्यापक पदासाठी १ लाख ८५ हजार आणि सहयोगी प्राध्यापक पदासाठी १ लाख ७० हजार रुपये दरमहा मानधन दिले जाणार आहे. त्यांचा नियुक्तीचा कालावधी हा नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत किंवा ३६४ दिवसांचा राहील. महाविद्यालयाचे कामकाज पार पाडल्यानंतर महाविद्यालयीन व रुग्णालयीन कर्तव्य व जबाबदाऱ्यांवर विपरीत परिणाम होणार नाही, याची दक्षता घेऊन उमेदवारास खाजगी वैद्यकीय व्यवसाय करण्याची मुभा राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k