SSC, HSC Exam : फॉर्म नं. १७ बाबत मोठी अपडेट, बोर्डाने वाढवली अर्ज भरण्याची मुदत

राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली. सध्याची संपर्क केंद्र शाळेमार्फत नाव नोंदणी अर्ज स्विकारण्याची प्रचलित पध्दत बंद करण्यात आली आहे.

SSC, HSC Exam : फॉर्म नं. १७ बाबत मोठी अपडेट, बोर्डाने वाढवली अर्ज भरण्याची मुदत

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (SSC Board) फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी (SSC Exam) व बारावीच्या परीक्षेसाठी (HSC Exam) विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. १७ भरून परीक्षेस बसण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना दि. ११ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार होते. आता ही मुदत वाढविण्यात आली आहे.  

 

राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली. सध्याची संपर्क केंद्र शाळेमार्फत नाव नोंदणी अर्ज स्विकारण्याची प्रचलित पध्दत बंद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांचे ज्या पध्दतीने सर्व कनिष्ठ महाविद्यालयातून नावनोंदणी अर्ज स्विकारण्यात येतात, त्याप्रमाणेच माध्यमिक दहावीच्या खाजगी विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी अर्ज सर्व मान्यता प्राप्त माध्यमिक शाळांमधून स्विकारण्याची कार्यपध्दती मार्च २०२४ च्या परीक्षेपासून सुरु करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत.

Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar : अर्ज करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस

 

मंडळाकडून देण्यात आलेल्या महत्वाच्या सुचना

. खाजगी विद्यार्थ्यांनी इ.१० वी व इ.१२ वी साठी नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्विकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी..

. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील वेबसाईटचा वापर करावा.

.१० वी - http://form17.mh-ssc.ac.in

. १२ वी - http://form17.mh-hsc.ac.in

. विद्यार्थ्याने अर्ज भरण्याकरिता १) शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत), नसल्यास व्दितीय प्रत व प्रतिज्ञापत्र २) आधारकार्ड ३) स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो स्वतःजवळ ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरताना सदर कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावयाची आहेत.

- कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर / मोबाईलव्दारे कागदपत्राचे फोटो काढून ते अपलोड करावेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य (compulsor) आहे.

. संपूर्ण अर्ज भरुन झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्याला त्याने अर्जातः नमूद केलेल्या ई-मेलवर पाठविली जाणार आहे. तसेच या संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट, शुल्क पावती व हमीपत्र यासह दोन प्रतीत काढून घ्यावी.

. विद्यार्थ्यांनी अर्ज ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोच पावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे नाव नोंदणी अर्जावर नमूद केलेल्या माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विहीत मुदतीत जमा करावयाची आहे.  

. खाजगी विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी शुल्क – इयत्ता दहावी – १ हजार रुपये नोंदणी शुल्क व १०० रुपये प्रक्रिया शुल्क तर इयत्ता बारावीसाठी ६०० रुपये नोंदणी शुल्क व १०० रुपये प्रक्रिया शुल्क.

. इयत्ता दहावी परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नाव नोंदणी करताना विद्यार्थ्याच्या पत्यानुसार व त्याने निवडलेल्या माध्यम निहाय त्यास माध्यमिक शाळांची यादी दिसेल त्यामधील एका माध्यमिक शाळेची निवड विद्यार्थ्यांने करावयाची आहे. या माध्यमिक शाळेने परीक्षा अर्ज प्रकल्प अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक / तोंडी, श्रेणी विषय संदर्भातील कामकाज व अनुषंगिक मूल्यमापन करावयाचे आहे.

. दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ट व्हावयाचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या / प्राधिकृत केलेल्या हॉस्पिटलच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित प्रमाणित करुन अर्जासोबत सादर करावी व आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ / कनिष्ठ महाविद्यालय / माध्यमिक शाळा यांचेकडून माहिती प्राप्त करुन घ्यावी.

. ऑनलाईन अर्ज भरताना कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. ०२० - २५७०५२०७ / २५७०५२०८/२५७०५२७१ वर संपर्क साधावा.

१०. विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी तसेच विद्यार्थ्यांनी अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाकडून निर्धारित कालावधीनंतर परत घेवून जाण्याची दक्षता घ्यावी.

११. पात्र विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेचे अर्ज (examination form) मंडळाने विहित केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे.

ऑनलाईन नावनोंदणी अर्ज भरण्याचे वेळापत्रक

अर्ज व शुल्क भरणे

२० ते ३० सप्टेंबर

पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद शाळेत जमा करणे

२२ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर

शाळांकडून विद्यार्थ्यांचे अर्ज विभागीय मंडळाकडे जमा करणे 

५ ऑक्टोबर

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j