NEET परीक्षेतील गैरप्रकाराची CBI नाही; न्यायालयीन चौकशी करा; स्पर्धा परीक्षा समन्वय समितीची मागणी 

NEET परीक्षेतील पेपरफुटीचे प्रकरण समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. त्यानंतर केंद्र सरकारने नीट परीक्षा 2024 मधील गैरव्यवहाराचा तपास CBI कडे सोपवण्याचा निर्णय घेतला.

NEET परीक्षेतील गैरप्रकाराची CBI नाही;  न्यायालयीन चौकशी करा; स्पर्धा परीक्षा समन्वय समितीची मागणी 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

NEET परीक्षेतील (NEET Exam) पेपरफुटीचे प्रकरण (Paper leak case) समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. त्यानंतर केंद्र सरकारने नीट ( NEET) परीक्षा 2024 मधील गैरव्यवहाराचा तपास CBI कडे सोपवण्याचा निर्णय घेतला. मात्र, या प्रकरणाची सीबीआय नाही तर न्यायालयीन चौकशी (Judicial inquiry) करण्याची मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने (Competitive Examination Coordination Committee) 'एक्स' या आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर केली आहे. 

NEET परीक्षेच्या CBI चौकशीचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. पण आमची मागणी न्यायालयीन चौकशीची आहे, कारण CBI कशाप्रकारे काम करते ते सर्वांना माहिती असेलच? असे म्हटले आहे. महाराष्ट्रातील तलाठी भरतीत सुध्दा याचप्रकारे पेपरफुटी झाली. समन्वय समितीच्या तक्रारी नंतर FIR सुध्दा झाली आहे. तलाठी भरती मधील पेपरफुटीची काही वेगळी नव्हती. अनेक परीक्षा केंद्रांवर पेपरफुटी झाली आहे. या घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करावी आणि नियुक्त्या देऊ नये, अशी आमची मागणी आहे.

तलाठी भरती घोटाळ्याचे सर्व पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. तलाठ्यांच्या जागा २५-३० लाखात विकल्या गेल्या आहेत. येत्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी तलाठी भरतीच्या, न्यायालयीन चौकशीची मागणी लाऊन धरावी, अशी मागणी सुद्धा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली आहे.