प्रियदर्शनी SRPF स्कूलचा भव्य उद्घाटन सोहळा; गुणवत्तापूर्ण शिक्षण हीच ओळख 

प्रियदर्शनी स्कूलने पुणे जिल्ह्यानंतर सातारा जिल्ह्यातही आपल्या शाखा सुरू केल्या आहेत.

प्रियदर्शनी SRPF स्कूलचा भव्य उद्घाटन सोहळा; गुणवत्तापूर्ण शिक्षण हीच ओळख 

एज्यूवार्ता न्यूज नेटवर्क 

केवळ पुण्यात आणि महाराष्ट्रातच नाही तर देशात नावलौकिक मिळवलेल्या प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूलने (Priyadarshani Group Of Schools)पुणे पोलीस पब्लिक स्कूलच्या माध्यमातून पोलिसांच्या मुलांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास सुरूवात केली.त्यानंतर वानवडी येथे  SRPF जवानांच्या मुलांसाठी मागील वर्षी प्रि-स्कूल सुरू करण्यत आले आणि या वर्षी प्रियदर्शनी SRPF प्रायमरी स्कूल (Priyadarshani SRPF Primary School)सुरू होत आहे. या प्रायमरी स्कूलचा भव्य उद्घाटन समारंभ येत्या 24 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे.त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण हीच ओळख घेऊन काम करणाऱ्या प्रियदर्शनी स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. 

 वानवडी येथील  SRPF जवानांच्या मुलांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या शाळेच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून राज्य राखीव पोलीस बलाचे अप्पर पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद, राज्य राखीव पोलीस बलाचे पोलीस महानिरीक्षक अशोक मोराळे, राज्य राखीव पोलीस बलाच्या कमांडन्ट  ग्रुप एक आणि दोनच्या नम्रता पाटील यांच्यासह प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूलचे विश्वस्त डॉ.राजेंद्र सिंह आदी उपस्थित राहणार आहेत. 

काल सुसंगत आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासाच्या दृष्टीने अत्याधुनिक साधानांच्या सहाय्याने प्रियदर्शनी स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले जाते.आर्टिफिशियल इंटेलिजन्स ,रोबोटिक्ससह विद्यार्थ्यांना आधुनिक ज्ञान दिले जाते.त्यातच नवीन राष्ट्रीय धोरणानुसार विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित रोजगाराभिमुख अभ्यासक्रमाचे धडे दिले जात आहेत.प्रियदर्शनी स्कूलने पुणे जिल्ह्यानंतर सातारा जिल्ह्यातही आपल्या शाखा सुरू केल्या आहेत.