वैद्यकीय शिक्षण विभागात पाच हजारांहून अधिक पदांची कंत्राटी भरती

संचालनालयाच्या अधिपत्याखालील २७ शासकीय वैद्यकीय, आयुर्वेद, होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयांतील कुशल, अकुशल व अर्धकुशल अशी एकूण ५ हजार ५६ पदे कंत्राटी पध्दतीने भरली जाणार आहेत.

वैद्यकीय शिक्षण विभागात पाच हजारांहून अधिक पदांची कंत्राटी भरती
DMER

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यात कंत्राटी भरतीवरून (Contractual Recruitment) विरोधकांकडून राज्य सरकारला (Maharashtra Government) धारेवर धरले जात आहे. त्यातच आता वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामध्ये (Medical Education and Reserach Department) तब्बल पाच हजारांहून अधिक पदांची कंत्राटी पध्दतीने भरती करण्यास मान्यता देण्यात आल्याचे समोर आले आहे. या भरतीसाठी एका सेवापुरवठादाराचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

 

संचालनालयाच्या अधिपत्याखालील २७ शासकीय वैद्यकीय, आयुर्वेद, होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयांतील कुशल, अकुशल व अर्धकुशल अशी एकूण ५ हजार ५६ पदे कंत्राटी पध्दतीने भरली जाणार आहेत. भरतीच्या प्रक्रियेसाठी फेब्रुवारी महिन्यापासूनच पुरवठादार नियुक्तीसाठी निविदाप्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

Nobel Prize : कोणत्या संशोधनासाठी मिळाला वैद्यकशास्त्रातील यंदाचा नोबेल पुरस्कार?

 

शासनाने बाह्यस्त्रोतामार्फत पदे भरण्यासाठी नऊ पुरवठादारांचे पॅनल नियुक्त केल्याने त्यांच्याकडूनच कंत्राटी पदे भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार वैद्यकीय शिक्षण विभागातील पदभरतीसाठी सैनिक इंटेलिजन्स सिक्युरिटी प्रा. लि. या सेवापुरवठादाराची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पुढील पाच वर्षांसाठी असेल.

 

काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने कंत्राटी भरतीचा शासन निर्णय जारी केला आहे. त्यामध्ये शिक्षकांसह विविध विभागातील अनेक पदांसाठी कंत्राटी भरतीसाठी नऊ सेवापुरवठादारांना मान्यता देण्यात आली आहे. हा जीआर आल्यानंतर विरोधी पक्षांनी त्याविरोधात रान उठवले आहे. तसेच इतर विविध संघटनांनीही कंत्राटीकरणाला विरोध केला आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j