केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात भरती सुरू ; बारावी पास उमेदवारांना संधी

पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  09 जून पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै आहे.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात भरती सुरू ; बारावी पास उमेदवारांना संधी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 केंद्रीय सशस्त्र पोलीस दला (Central Armed Police Force) अंतर्गत सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल (Assistant Sub-Inspector, Head Constable) पदांच्या एकूण 1 हजार 526 रिक्त जागा भरती प्रक्रिया जाहीर (Recruitment process announced) करण्यात आली आहे. पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 9 जून पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरूवात झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जुलै आहे.

बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने (BSF) सहाय्यक उपनिरीक्षक पदाच्या 243 रिक्त जागा आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलासाठी हेड कॉन्स्टेबल पदाच्या 1283 रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली. पात्र उमेदवार त्यांचे ऑनलाइन अर्ज अधिकृत भरती पोर्टल rectt.bsf.gov.in वर 9 जून ते 8 जुलै 2024 पर्यंत सबमिट करू शकतात.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरतीमध्ये 1 हजार 526 रिक्त जागा भरण्यासाठी हेड कॉन्स्टेबल आणि सहाय्यक उपनिरीक्षक पदांची भरती होत असून त्यासंबंधीची शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी rectt.bsf.gov.in या  संकेतस्थळाला भेट द्यावी. 

या पदांसाठी बारावी उत्तीर्ण व टायपिंग आणि स्टेनो झालेला असणे आवश्यक आहे. जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस यांच्यासाठी १०० रुपये परीक्षा शुल्क असणार आहे. तर एससी/एसटी/ईएसएम यांच्यासाठी निशुल्क असणार आहे. शारीरिक मानक चाचणी (PST) आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)- पात्रता, लेखी परीक्षा- 100 गुण, कौशल्य चाचणी (टायपिंग/स्टेनो)- पात्रता, दस्तऐवज पडताळणी, वैद्यकीय तपासणी हे भरती प्रक्रियेतील टप्पे असणार आहेत.