विद्यापीठाच्या पाच नामवंत माजी विद्यार्थ्याचा धर्मेद्र प्रधान यांच्या हस्ते सत्कार 

ज्येष्ठ  शिक्षण  तज्ज्ञ  डॉ.  .शां.ब. मुजुमदार ,  जेष्ठ शल्यचिकीत्सक डॉ.  के.एच. संचेती, प्रसिद्ध. कथ्थक नृत्यांगना शमा भाटे, जेष्ठ उद्योजक डॉ. प्रमोद चौधरी , मराठीतील प्रसिद्ध लेखिका डॉ. अरुणा ढेरे या मान्यवराचा सत्कार केला जाणार आहे.

विद्यापीठाच्या पाच नामवंत माजी विद्यार्थ्याचा धर्मेद्र प्रधान यांच्या हस्ते सत्कार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University ) अमृत महोत्सवा निमित्ताने विद्यापीठाच्या नामवंत  पाच माजी विद्यार्थ्याचा सत्कार केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान (Union Education Minister Dharmendra Pradhan) यांच्या हस्ते येत्या शनिवार विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात दुपारी २ वाजता होणार असल्याची माहिती अमृत मोहोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. राजेद्र विखे पाटील (Dr. Rajendra Vikhe Patil) यांनी शुक्रवारी सांगितले. 

राजेद्र विखे पाटील म्हणाले,  अमृत महोत्सव समिती पुढील वर्ष भर  विविध कार्यक्रम राबवणार आहे. याअंतर्गत विद्यापीठ माजी विद्यार्थी संघ  यांच्या वतीने  वर्षभर ७५ नामवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात  येणार आहे .  यापैकी पाच नामवंत माजी विद्यार्थ्यांचा सन्मान धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते  शनिवारी होणार असुन यात ज्येष्ठ  शिक्षण  तज्ज्ञ  डॉ.  .शां.ब. मुजुमदार ,  जेष्ठ शल्यचिकीत्सक डॉ.  के.एच. संचेती, प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना शमा भाटे, जेष्ठ उद्योजक डॉ. प्रमोद चौधरी , मराठीतील प्रसिद्ध लेखिका डॉ. अरुणा ढेरे या मान्यवराचा समावेश आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री  चंद्रकांत पाटील , विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.  सुरेश गोसावी  प्र-कुलगुरु डॉ.  पराग काळकर, माजी विद्यार्थी संघाचे राजेश पांडे , तसेच विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य ,  विद्यापरीषद सदस्य, अधिसभा सदस्य , शिक्षक  व शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित राहणार आहेत.