सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अटल रँकिंगमधून बाहेर

केवळ देशातच नव्हे तर जगभरात विद्यापीठाचा नावलौकिक आहे. जागतिक व भारतीय विद्यापीठांच्या क्रमवारीत आघाडीवर असलेले पुणे विद्यापीठ हे राज्यातील एकमेव विद्यापीठ असे आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अटल रँकिंगमधून बाहेर
Savitribai Phule Pune University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

‘एनआयआरएफ’ रँकिंग (NIRF Ranking) मध्ये घसरण झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) टाईम्स रँकिंगमध्ये (Times Ranking) आघाडी घेतल्याचे पाहायला मिळाले. एशिया विद्यापीठ रँकिंग (Asia University Ranking) क्रमवारीमध्ये पुणे विद्यापीठ २०० च्या आता आले. मात्र, खेदाची बाब म्हणजे यंदा विद्यापीठ अटल रँकिंगच्या (Atal Ranking) बाहेर असणार आहे. केवळ विद्यापीठातील काही  अधिकारी व कर्मचा-यांच्या दुर्लक्षामूळे विद्यापीठावर अटल रँकिंगमधून बाहेर पडण्याची वेळ आली आहे.

केवळ देशातच नव्हे तर जगभरात विद्यापीठाचा नावलौकिक आहे. जागतिक व भारतीय विद्यापीठांच्या क्रमवारीत आघाडीवर असलेले पुणे विद्यापीठ हे राज्यातील एकमेव विद्यापीठ असे आहे. विद्यापीठाला मोठा ऐतिहासिक व शैक्षणिक वारसा लाभला आहे. त्यामुळे या विद्यापीठाकडून सर्वांच्याच मोठ्या अपेक्षा आहेत. विद्यापीठाचे घसरलेले एनआयआरएफ रँकिंग हा सर्वांचाच चिंतेचा विषय आहे. त्यात पुणे विद्यापीठाने २०२२ च्या अटल रँकिंग ऑफ इन्स्टिटयूशन्स ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट रँकिंगसाठी अर्जच केला नसल्याची माहिती समोर आली आहे.

खासगी विद्यापीठांमध्ये शुल्क सवलतीची अंमलबजावणी कधी? विद्यार्थ्यांना फटका बसत असल्याच्या तक्रारी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे तत्कालीन प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्या कार्यकाळात अटल रँकिंगसाठी अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. परंतु, त्याच कालावधीत संबंधित विभागाच्या प्रमुखांनी हे पद सोडले. दरम्यानच्या काळात दुस-या व्यक्तीकडे या पदाचा कार्यभार देण्यात आला. अटल रँकिंगशी निगडीत दोन बैठकाही पार पडल्या.

रिसर्च आणि इनोव्हेशनशी निगडीत असणारा डेटा दोन वेगवेगळ्या विभांगांकडून जमा होऊन तो मर्यादित कालावधीत ऑनलाईन जमा करणे अपेक्षित होते. पण केवळ समन्वय आणि याबाबत गांभीर्य नसल्याने पुणे विद्यापीठाला अटल रँकिंगची माहिती भरता आली नाही. पुणे विद्यापीठ २०२१ अटल रँकिंगमध्ये देशात आठव्या क्रमांकावर होते. मात्र, यावेळी केवळ माहिती समबीट न केल्याने विद्यापीठाला अटल रँकिंगमध्ये कोणतेही स्थान मिळणार नाही.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2