11th Admission : अकरावीची पहिली प्रवेश फेरी आजपासून; मुदतीत करा नोंदणी, अर्जाचा दुसरा भाग महत्वाचा

विद्यार्थ्यांना आजपासून पहिल्या फेरीसाठी आपले पसंती क्रमांक नोंदवता येणार आहेत. १३ ते १५ जून या कालावधीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जाचा भाग एक भरलेला आहे व त्यांची पडताळणी झालेली आहे.

11th Admission : अकरावीची पहिली प्रवेश फेरी आजपासून; मुदतीत करा नोंदणी, अर्जाचा दुसरा भाग महत्वाचा
11th Admission Process

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

इयत्ता अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची (11th Admission Process) पहिली फेरी आजपासुन (दि. ८) सुरु झाली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना (Students) प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी (Online Registration) आणि अर्जाचा पहिला भागही भरता येईल. भाग दोन भरण्यासाठी १२ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे किमान एक आणि जास्तीत जास्त १० पसंतीक्रम (College Options) द्यावे लागणार आहेत. (11th Admission CAP Round 1)

विद्यार्थ्यांना आजपासून पहिल्या फेरीसाठी आपले पसंती क्रमांक नोंदवता येणार आहेत. १३ जून ते १५ जून या कालावधीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जाचा भाग एक भरलेला आहे व त्यांची पडताळणी झालेली आहे. अशा विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी जे उमेदवार पात्र आहेत त्या विद्यार्थ्यांची  गुणवत्ता यादी १६ ते १८ जून दरम्यान प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 

पुस्तकातील वहीच्या पानांवर करता येतील २१ नोंदी! ‘बालभारती’ने सांगितले १५ फायदे

ज्या विद्यार्थ्यांना गुवत्तायादीनुसार मिळालेल्या विद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल ते १९ ते २२ जून या कालावधीत विद्यालयातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू शकतात. पण ज्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीनुसार मिळालेल्या विद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल त्यांना दुसऱ्या फेरीची वाट पाहावी लागणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंती क्रमांकाचे विद्यालय मिळूनसुद्धा त्यांनी २२ जून पर्यंत संबंधित विद्यालयात प्रवेश घेतला नसेल अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीसाठी अर्ज करता येणार नाही. ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया अंतर्गत किती विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश घेतला याबाबत त्या महाविद्यालयांनी २२ जून पर्यंत तपशील द्यायचा आहे.

दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; राज्य मंडळाकडून अधिकृत घोषणा

त्यानंतर २३ ते ३० जून आणि १ जुलै ते ९ जुलै या कालावधीत प्रवेशाची दुसरी आणि तिसरी फेरी घेण्याचे नियोजित आहे. विशेष म्हणजे मागच्या वर्षी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या आणि नंतर तीन विशेष फेऱ्या घेण्यात आल्या होत्या. पण यंदा मात्र फक्त एकच विशेष फेरी घेण्यात येणार आहे. ही फेरी  १० ते १८ जुलै या कालावधीत घेण्याचे प्रस्तावित आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo