B.Arch Admission : अखेर प्रवेश प्रक्रियेला मिळाला मुहूर्त, २९ सप्टेंबर रोजी वर्ग सुरू होणार

सीईटी सेलकडून जुलै महिन्यांतच अनेक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू केली होती. आर्किटेक्टरच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेशही सुरू झाले. पण पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना बरीच प्रतिक्षा करावी लागली.

B.Arch Admission : अखेर प्रवेश प्रक्रियेला मिळाला मुहूर्त, २९ सप्टेंबर रोजी वर्ग सुरू होणार
B.Arch Admission

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्य सामाईक प्रवेश चाचणी कक्षाकडून (CET Cell) सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. आता हे प्रवेश अंतिम टप्प्यात आले तर आर्किटेक्चरच्या पदवी (B.Arch Admission 2023) अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांसह पालक चिंतेत होते. अखेर सीईटी सेलने सोमवारी रात्री उशिरा केंद्रीभूत प्रवेशाचे (CAP) वेळापत्रक जाहीर केल्याने विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. मात्र, असे असले तरी सेलकडून प्रवेशासाठी कमी कालावधी दिल्याने एक महिन्याच्या आता प्रक्रिया पूर्ण होऊन २९ सप्टेंबर रोजी वर्गही सुरू करण्याचे नियोजन केले आहे.

सीईटी सेलकडून जुलै महिन्यांतच अनेक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू केली होती. आर्किटेक्टरच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेशही सुरू झाले. पण पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना बरीच प्रतिक्षा करावी लागली. खासगी विद्यापीठांसाठी प्रक्रिया लांबविली जात असल्याचा आरोपही झाला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय प्रवेश चाचणी परीक्षेसाठी (NATA) प्रवेश लांबविले जात असल्याचेही बोलले जात होते. अखेर सोमवारी रात्री या सर्व चर्चांवर सेलकडून वेळापत्रक जाहीर करत पडदा टाकला आहे.

विद्यार्थ्यांची लूट करणारा विद्यापीठातील तो कर्मचारी निलंबित

वेळापत्रकानुसार, प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी आणि कागदपत्रे अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांना २ सप्टेंबरपर्यंत ही कामे करावी लागतील. त्यानंतर नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅप फेरीतून प्रवेश दिला जाणार नाही. नोंदणी केल्यानंतर लगेचच कागदपत्रांची पडताळणी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने करावी लागेल. त्यासाठी ३ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. ही पडताळणी न केल्यास विद्यार्थ्यांना प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. त्यानंतर ५ सप्टेंबर रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी तर १० सप्टेंबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाईल.

गुणवत्ता यादी व संस्थांमध्ये उपलब्ध जागांच्या आधारे विद्यार्थ्यांना तिन्ही फेऱ्यांमध्ये पसंतीक्रम नोंदवावे लागतील. त्यानंतर निवड यादी प्रसिध्द केली जाणार आहे. निवड यादीनुसार संस्थेत प्रवेश निश्चिती, किंवा प्रवेश फ्रीज करणे, नॉन फ्रीज करणे या प्रक्रिया कराव्या लागतील. दुसरी फेरी पूर्ण झाल्यानंतर २९ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष अध्यापन वर्ग सुरू होतील.

तीन केंद्रीभूत फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर सरकारी, अनुदानित आणि विनानुदानित संस्थांमधील रिक्त जागांवर प्रवेशासाठी संस्थानिहाय फेरी राबविली जाईल. त्यासाठी दि. ७ ते १२ ऑक्टोबर रोजी संस्थेच्या संकेतस्थळावर तसेच वृत्तपत्रांमध्ये रिक्त जागांची माहिती प्रसिध्द केली जाईल. त्यानुसार नोंदणीकृत विद्यार्थ्यांचे अर्ज मागविणे, त्यानुसार गुणवत्ता यादी तयार करणे आणि प्रवेश देणे ही प्रक्रिया संस्थांना याच कालावधीत पूर्ण करावी लागणार आहे.

SSC-HSC Exam 2024 : दहावी-बारावी परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर, मंडळाकडून अधिकृत घोषणा

आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि कागदपत्रे अपलोड करणे – दि. २ सप्टेंबरपर्यंत

कागदपत्रांची पडताळणी व अर्ज निश्चिती – दि. ३ सप्टेंबरपर्यंत

तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे – दि. ५ सप्टेंबर

हरकती नोंदविणे – दि. ६ ते ९ सप्टेंबर

अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे – दि. १० सप्टेंबर

पहिल्या केंद्रीभूत फेरीसाठी जागांची माहिती प्रसिध्द करणे – दि. १० सप्टेंबर

पहिली केंद्रीभूत फेरी

ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणे – दि. ११ ते १३ सप्टेंबर

तात्पुरती निवड यादी – दि. १५ सप्टेंबर

ऑनलाईन प्रवेश निश्चिती किंवा नाकारणे – दि. १६ ते १८ सप्टेंबर (दु. ३ पर्यंत)

प्रत्यक्ष संस्थेत जाऊन प्रवेश निश्चित करणे – दि. १६ ते १८ सप्टेंबर (सायं. ५ पर्यंत)

दुसरी केंद्रीभूत प्रवेश फेरी

रिक्त जागांची माहिती प्रसिध्द करणे – दि. १९ सप्टेंबर

ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणे – दि. २० ते २२ सप्टेंबर

तात्पुरती निवड यादी प्रसिध्द करणे – २३ सप्टेंबर

ऑनलाईन प्रवेश निश्चिती व नाकारणे – दि. २४ ते २६ सप्टेंबर (दु. ३ पर्यंत)

प्रत्यक्ष संस्थेत जाऊन प्रवेश निश्चित करणे – दि. २४ ते २६ सप्टेंबर (सायं. ५ पर्यंत)

तिसरी केंद्रीभूत प्रवेश फेरी

रिक्त जागांची माहिती प्रसिध्द करणे – दि. २७ सप्टेंबर

ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणे – दि. २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर

तात्पुरती निवड यादी प्रसिध्द करणे – दि. ३ ऑक्टोबर

ऑनलाईन प्रवेश निश्चिती – दि. ४ ते ४ ऑक्टोबर (दु. ३ पर्यंत)

प्रत्यक्ष संस्थेत जाऊन प्रवेश निश्चित करणे – दि. ४ ते ६ ऑक्टोबर (सायं. ५ पर्यंत)

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo