SSC-HSC Exam 2024 : दहावी-बारावी परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर, मंडळाकडून अधिकृत घोषणा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षा घेतली जाईल.

SSC-HSC Exam 2024 : दहावी-बारावी परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर, मंडळाकडून अधिकृत घोषणा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (SSC-HSC Board) इयत्ता दहावी व बारावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार इयत्ता बारावीची (12th Exam) लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत तर दहावीची परीक्षा (10th Exam) १ ते २२ मार्च या कालावधीत होणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षा घेतली जाईल. परीक्षेचे दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

HSC Result 2023 : पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर, यंदा निकालात घट

शाळा / कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. दहावीच्या परीक्षा प्रचलित पध्दतीनुसार आयोजित करण्यात येतील याची सर्व कनिष्ठ महाविद्यालये व माध्यमिक शाळा, विद्यार्थी, शिक्षक, पालक व संबंधीत घटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

मंडळाच्या संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांचकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राहय धरू नये, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.

10th supplementary exam : दहावी पुरवणी परीक्षेत १३ हजार ४७८ विद्यार्थी उत्तीर्ण ; १७ हजार ३१९ विद्यार्थ्यांना एटीकेटी

प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येईल. सदर वेळापत्रकांबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे १५ दिवसाच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या सूचनांवर विचार केला जाणार नाही, असे मंडळाकडून सांगण्यात आले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo