पुढील वर्षी राज्यातील पाच हजार महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी

महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी झाली नाही. नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर वर्षभरात राज्यातील दीड हजार महाविद्यालयांत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

पुढील वर्षी राज्यातील पाच हजार महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुढील वर्षीपासून संपूर्ण राज्यातील पाच हजार शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP 2020) अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती राज्याचे उच्च शिक्षण तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केला. चालू शैक्षणिक वर्षात सुमारे दीड हजार संस्थांमध्ये या धोरणाची अंमलबजावणी सुरू केल्याचेही पाटील यांनी सांगितले. (Higher Education Institutes in Maharashtra)

'सतीश मिसाळ एज्युकेशनल फाउंडेशन'च्या 'ब्रिक ग्रुप ऑफ इन्‍स्टिट्यूटस्'च्या दहाव्या स्थापना दिन आणि पदवीप्रदान समारंभात चंद्रकांत पाटील आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन केले. केसरकर यांच्या हस्ते आर्किटेक्चर आणि इंटीरिअर डिझाइनच्या विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.

B.Arch Admission : अखेर प्रवेश प्रक्रियेला मिळाला मुहूर्त, २९ सप्टेंबर रोजी वर्ग सुरू होणार

पाटील म्हणाले, महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी झाली नाही. नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर वर्षभरात राज्यातील दीड हजार महाविद्यालयांत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले. पुढील वर्षी राज्यातील सर्व ४२ विद्यापीठांतील पाच हजार महाविद्यालयांत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाईल.

राष्ट्रीय शिक्षण धोरणात कौशल्य विकासावर भर देण्यात येत आहे. जगाच्या गरजा लक्षात घेऊन विकास केला जात आहे. त्यामुळे बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल. आता आपण पदवी घेत असताना आवडणाऱ्या अन्य शाखेच्या विषयाचा अभ्यास करू शकतो. भाषा, इतिहास, परंपरेचा अभ्यास केला पाहिजे, त्यांचा अभिमान बाळगा. असे केसरकर यांनी नमूद केले.

दरम्यान, अक्षिता साठे, भूमिका गायके, अभिजीत लांडगे, सीमा खान व गौरी ठाणगे या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ, दीपक मिसाळ, संचालिका डॉ. पूजा मिसाळ, करण मिसाळ, मानसी देशपांडे, मनोज देशपांडे, प्राचार्या डॉ. पूर्वा केसकर, उपप्राचार्या मनाली देशमुख, इंटेरियर विभाग प्रमुख मयुरेश शिरोळकर आदी उपस्थित होते.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo