विद्यार्थ्यांची लूट करणारा विद्यापीठातील तो कर्मचारी निलंबित

शनिवारी परीक्षा विभागातील संजय नेवसे या कर्मचाऱ्याने एका विद्यार्थ्याकडून तीन हजार रुपये घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात नेवसे हा कर्मचा-याने मी पैसे मागितले नाही या विद्यार्थ्यांनेच मला दिले, अशी कबुली दिली होती.

विद्यार्थ्यांची लूट करणारा विद्यापीठातील तो कर्मचारी निलंबित

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) परीक्षा विभागातील कर्मचाऱ्याला (employee of exam department) गुणपत्रिकेसाठी विद्यार्थ्याकडून पैसे घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. विद्यापीठाने या कर्मचाऱ्यावर सोमवारी निलंबनाची कारवाई (Action of suspension) केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची लुट करणाऱ्याची गय केली जाणार नाही,असा स्पष्ट संदेश विद्यापीठ प्रशासनाने दिला आहे.

हेही वाचा : SPPU News : डॉ. पराग काळकर यांनी स्वीकारला प्र-कुलगुरू पदाचा कार्यभार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात विद्यार्थ्यांना विविध कागदपत्र मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्यात काही कर्मचारी विद्यार्थ्यांकडून कागदपत्रांसाठी पैसे घेत असल्याचे बाब समोर आली. शनिवारी परीक्षा विभागातील संजय नेवसे या कर्मचाऱ्याने एका विद्यार्थ्याकडून तीन हजार रुपये घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात नेवसे हा कर्मचा-याने मी पैसे मागितले नाही या विद्यार्थ्यांनेच मला दिले, अशी कबुली दिली. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांनी स्पष्ट केले होते.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी  विद्यापीठातील कर्मचारी गुणपत्रिकेसाठी पैसे घेत असल्याची बाब समोर आणली होती. संबंधित कर्मचाऱ्यांने विद्यार्थ्याकडून घेतलेले पैसे त्याला परत दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आले. त्यामुळे सर्व बाबींचा विचार करून विद्यापीठ प्रशासनाने व्यवसायाला निलंबित केले.कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.