शैलजा दराडे यांना १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी; कॉल रेकॉर्डिंग पोलिसांच्या ताब्यात

पोपट सुखदेव सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून दराडे यांच्यासह त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. इंदापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शैलजा दराडे यांना १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी; कॉल रेकॉर्डिंग पोलिसांच्या ताब्यात
Shailaja Darade in Police Custody

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या (MSCE) तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे (Shailaja Darade) यांना आर्थिक फसवणूक प्रकरणात मंगळवारी न्यायालयाने १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांना हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) सोमवारी अटक केली होती. शिक्षण विभागात (Education Department) नोकरी लावण्याच्या आमिषाने ४४ जणांची ४ कोटी ८५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

पोपट सुखदेव सूर्यवंशी (वय ५०, रा. खाणजोडवाडी, आटपाडी, सांगली) यांच्या फिर्यादीवरून दराडे यांच्यासह त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. इंदापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैलजा दराडे यांना काही दिवसांपूर्वीच सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांना सोमवारी अटक केली आणि मंगळवारी पुण्यातील लष्कर न्यायालयात हजर केले. यावेळी पोलिसांकडून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली.

दहावी, बारावी परीक्षेची मोठी अपडेट; फॉर्म नं. १७ भरा ऑनलाईन, बोर्डाने दिली माहिती

गुन्ह्यातील फिर्यादी, साक्षीदार व आरोपी यांच्यामध्ये झालेल्या संभाषणाचे कॉल रेकॉर्डिंग पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपींच्या आवाजाचा नमुना (व्हाइस सॅम्पल) जप्त करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. तसेच आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. तसेच आणखी आरोपींची नावे पुढे येऊ शकता. त्यांनी लोकांना टीईटी पास करणे, शिक्षक पदावर, आरटीओ पदावर, तलाठी पदावर नोकरी लावतो असे नोकरीचे अमिष दाखवून ४ कोटी ८५ लाख रुपये स्वीकारून ४४ जणांची फसवणूक केली आहे, असेही पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

पुढील तपासासाठी आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला केला. त्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. जे. पाटील यांनी दराडे यांना १२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo