SPPU News : विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता पदासाठी मोठी चुरस

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील चारही विद्याशाखांमध्ये सर्वाधिक २१ अर्ज सध्यातरी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी आले आहेत.

SPPU News : विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता पदासाठी मोठी चुरस
Savitribai Phule Pune University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) अधिष्ठाता पदाच्या (Dean) निवडीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. याअंतर्गत चार विद्याशाखांसाठी मंगळवारपर्यंत (दि. ८ ऑगस्ट) एकूण ५४ अर्ज आले आहेत. अजूनही अर्ज भरण्याची मुदत १८ ऑगस्टपर्यंत असल्याने अर्जांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. (Savitribai Phule Pune University News)

विद्यापीठातील चारही विद्याशाखांमध्ये सर्वाधिक २१ अर्ज सध्यातरी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी आले आहेत. त्याखालोखाल आंतरविद्याशाखीय अभ्याससाठी १८, मानव्यविज्ञानसाठी ९ आणि वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेसाठी केवळ सहा अर्ज आले आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा आणि आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेसाठी मोठी चुरस राहणार असल्याचे स्पष्टपणे दिसते.

MBBS Admission : राज्यात ९०० जागा पुन्हा वाढल्या, दुसऱ्या फेरीपासून मिळणार प्रवेश

विद्यापीठातील विद्याशाखांचे अधिष्ठाता हे पद खूप महत्वाचे मानले जाते. त्यामुळे या पदावर विराजमान होण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. या पदांवर काम केलेले काही जण कुलगुरू, प्र-कुलगुरू पदासाठी उत्सुक असतात.

सध्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे डॉ. पराग काळकर, मानव्यविज्ञानचे डॉ. विजय खरे आणि आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्यासशाखेचे अधिष्ठाता डॉ. दीपक माने हे आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo