MBBS Admission : राज्यात ९०० जागा पुन्हा वाढल्या, दुसऱ्या फेरीपासून मिळणार प्रवेश

नीट युजी २०२३ एमबीबीएस/बीडीएस अभ्यासक्रम प्रवेशासाठी जागांची माहिती दिनांक ३१/०७/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

MBBS Admission : राज्यात ९०० जागा पुन्हा वाढल्या, दुसऱ्या फेरीपासून मिळणार प्रवेश
MBBS Admission

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील (Medical College) एमबीबीएस (MBBS) व बीडीएस (BDS) या अभ्यासक्रमांच्या अनुक्रमे ९०० व १०० जागा पुन्हा वाढल्या आहेत. सीईटी सेलकडून (CET Cell) प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यानंतर आठ संस्थांना प्रवेशासाठी आवश्यक मान्यता नसल्याने अचानक त्यांची नावे वगळण्यात आली होती. त्यामुळे पहिल्या फेरीत त्यांचा समावेश नव्हता. आता या संस्थांना मान्यता मिळाल्याने दुसऱ्या फेरीसाठी हजार जागा पुन्हा वाढल्या आहेत.

नीट युजी २०२३ एमबीबीएस/बीडीएस अभ्यासक्रम प्रवेशासाठी जागांची माहिती दिनांक ३१/०७/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यामध्ये महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स, सेवाग्राम, वर्धा या संस्थेतील एमबीबीएसच्या १०० जागांसह इतर सात खासगी संस्थांमधील ९०० जागांचाही प्रवेशासाठी समावेश करण्यात आला होता. मात्र, प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर महाविद्यालयांना प्रवेशासाठी आवश्यक मान्यता प्राप्त झाली नव्हती.

दहावी, बारावी परीक्षेची मोठी अपडेट; फॉर्म नं. १७ भरा ऑनलाईन, बोर्डाने दिली माहिती

मान्यता नसल्याने आठ सस्थांना प्रथम प्रवेश फेरीतून वगळण्यात आले होते. त्यामुळे पहिल्या फेरीतून एमबीबीएसच्या ९०० आणि बीडीएसच्या १०० जागा कमी झाल्या. आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून या महाविद्यालयांना प्रवेशासाठी आवश्यक मान्यता प्राप्त झाली असल्यामुळे सदर महाविद्यालयांचा समावेश दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये करण्यात येणार आहे.

सध्या पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, राज्यात एमबीबीएसच्या ३२ सरकारी महाविद्यालयांमध्ये ५ हजार २०० आणि खासगी महाविद्यालयांमध्ये ३ हजार ७० जागा आहेत. अशा एकूण ८ हजार २७० जागांवर प्रवेश होणार आहेत.

दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये अंतर्भूत करण्यात येणाऱ्या महाविद्यालयांची यादी

  • महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स, सेवाग्राम, वर्धा (एमबीबीएस - १००)
  • तेरणा मेडिकल कॉलेज, नवी मुंबई (एमबीबीएस - १५०)
  • एसीपीएम मेडिकल कॉलेज, धुळे (एमबीबीएस - १००)
  • डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज, अमरावती (एमबीबीएस - १५०)
  • डॉ. एन. वाय. तासगांवकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, कर्जत (एमबीबीएमस - १००)
  • सिंधुदूर्ग शिक्षण प्रसारक मंडळ मेडिकल कॉलेज, कुडाळ, सिंधुदूर्ग (एमबीबीएस - १५०)
  • वेदांता मेडिकल कॉलेज, पालघर (एमबीबीएस - १५०)
  • तेरणा डेंटल कॉलेज, नवी मुंबई (बीडीएस - १००)

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo