SPPU News : मुक्त व दुरस्थ अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू, विद्यार्थ्यांचा कल वाढतोय

मागील वर्षी ५ हजार ४४२ विद्यार्थ्यांनी एम.कॉम व बी.ए., बी.कॉम. अभ्यासक्रमास प्रवेश घेतला होता. यंदा त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

SPPU News : मुक्त व दुरस्थ अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू, विद्यार्थ्यांचा कल वाढतोय

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त व दुरुस्थ अध्ययन प्रशालेच्या प्रवेश प्रक्रियेला मंगळवारपासून (दि. १ ऑगस्ट) सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना येत्या ३० ऑगस्टपर्यंत प्रवेशासाठी नोंदणी करता येणार आहे. दरवर्षी दुरुस्थ अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी संख्येत वाढ होत आहे.

काही कारणांमुळे शिक्षण सोडावे लागणाऱ्या, नोकरी करून शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांना आणि गृहिणींना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पुणे विद्यापीठात मुक्त व दुरुस्थ अध्ययन प्रशालेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमास प्रवेश दिला जातो.

मागील वर्षी ५ हजार ४४२ विद्यार्थ्यांनी एम.कॉम व बी.ए., बी.कॉम. अभ्यासक्रमास प्रवेश घेतला होता. यंदा त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी एफ. वाय. बी.कॉम. अभ्यासक्रमास १ हजार १०१ विद्यार्थ्यांनी तर एम.कॉम. अभ्यासक्रमास २ हजार ८९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता.

विद्यापीठाच्या http://unipune.ac.in/SOL/ या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दि. ३० ऑगस्टपर्यंत नोंदणी करता येणार आहे. तर दि. ३१ ऑगस्टपर्यंत शुल्कासह प्रवेश अर्ज भरता येणार आहेत. येत्या दि. २ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन भरलेल्या प्रवेश अर्जाची प्रत अभ्यास केंद्रावर जमा करावी लागणार आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD