युवा पिढीने स्मार्ट वर्कवर भर द्यावा : आमदार  सत्यजित तांबे

भौतिकशास्त्र या विषयात उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स च्यावतीने रौप्य महोत्सवी वर्षारंभानिमित्त कौतुकाची थाप टाकण्यात आली.

युवा पिढीने स्मार्ट वर्कवर भर द्यावा : आमदार  सत्यजित तांबे

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

आजच्या युवापिढीने (Youth) कष्टासोबत स्मार्ट वर्कही (Smart Work) केले पाहिजे. आपण एकाच मार्गाने यशा कडे धावत असतो, परंतू थोडे स्मार्टवर्क आणि रस्ता बदलून यशाचे शिखर गाठता येते, त्यामुळे स्मार्ट वर्कवर भर द्यावा, असे प्रतिपादन आमदार सत्यजित तांबे (MLA Satyajeet Tambe) यांनी केले.

भौतिकशास्त्र या विषयात उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स (आयओपी) च्यावतीने रोप्य महोत्सवी वर्षारंभानिमित्त वतीने कौतुकाची थाप टाकण्यात आली. ज्या मुलांनी चांगले यश संपादन केले आहे, अशा विद्यार्थ्यांचा सन्माचिन्ह देवून पुरस्कृत करण्यात आले. तसेच सन्मानित विद्यार्थ्यांच्या पालकांनाचाही फेटा बांधून सन्मान करण्यात आला. यावेळी डीआरडीओचे माजी संचालक डॉ. एम. आर. पाटकर, आमदार सत्यजित तांबे, प्रा. प्रमोद जाधव, प्रा. एन. एम. कुलकर्णी, नवनाथ जाधव, अ‍ॅड. वासंती जाधव आदी उपस्थित होते.  

11th Admission : विशेष फेरीनंतरही पुण्यात ५० हजार जागा रिक्त, आजपासून दुसरी फेरी

डॉ. पाटकर म्हणाले, पालकांनी आपल्या मुलांवर आपल्या अपेक्षा न थोपता मुलांना ज्या क्षेत्रात जायचे आहे, तिथे जावू द्यावे. त्यांच्या आवडीनुसार क्षेत्र निवडल्यास यश नक्की मिळते. आजच्या मुलांची विचार करण्याची क्षमता वाढली आहे, ज्या क्षेत्रात त्यांची आवड, इच्छा आहे, त्याच क्षेत्रात त्यांनी आपले करिअर घडवावे.

प्रा. प्रमोद जाधव यांनीही मार्गदर्शन केले. ते म्हणाले, प्रत्येक व्यक्तीकडे २४ तास असतात. या २४ तासाचा कोण कसा उपयोग करतो त्यानुसार त्यास फळ मिळत असते. आज या गुणंवत विद्यार्थ्यांनी आपल्या २४ तासाचा योग्य वापर केल्यामुळे आपल्या आईवडिलाची मान उंचावली आहे. त्यामुळे वेळेला महत्व द्या, एकदा वेळ निघून गेली की पुन्हा येत नाही.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD