बारावीनंतर दोन वर्षात शिक्षक व्हायचंय, मग ऑनलाईन अर्ज भरला का? नोंदणीला झाली सुरूवात

येत्या २० जुलै पर्यंत सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून प्रथम वर्षाचे वर्ग २० जुलै रोजी सुरू केले जाणार आहेत. दोन वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला १३ जून पासूनच सुरुवात झाली आहे.

बारावीनंतर दोन वर्षात शिक्षक व्हायचंय, मग ऑनलाईन अर्ज भरला का? नोंदणीला झाली सुरूवात
D.El.Ed. Admission Process

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील अध्यापक विद्यालयातील प्राथमिक शिक्षण पदविका (D.El.Ed.) अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया (Admission Process) सुरू झाली असून विद्यार्थ्यांना येत्या २७ जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती www.maa.ac.in  या संकेतस्थळावर 'इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन' मध्ये प्रवेश प्रक्रियेची माहिती उपलब्ध आहे. (Diploma in Elementary Education)

राज्यातील अध्यापक विद्यालयामधील व्यवस्थापन कोट्यातील आणि शासकीय कोट्यातील प्रवेश प्रक्रिया समांतर पद्धतीने राबविली जाते. अध्यापक विद्यालयांनी व्यवस्थापन कोट्याची प्रवेश प्रक्रिया २८ जून ते १८ जुलै या कालावधीत नियमानुसार राबवणे गरजेचे आहे. अध्यापक विद्यालयाने व्यवस्थापन कोटा प्रवेशाचे प्रस्ताव संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे २० जुलै पूर्वी सादर करणे आवश्यक आहे.

विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेेश प्रक्रियेला सुरूवात; राज्यातील ७७ महाविद्यालयांसाठी ऑनलाईन प्रक्रिया

येत्या २० जुलै पर्यंत सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून प्रथम वर्षाचे वर्ग २० जुलै रोजी सुरू केले जाणार आहेत. डी.एल.एड. अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला १३ जून पासूनच सुरुवात झाली आहे. प्राचार्यांनी संबंधित अध्यापक विद्यालयात व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश ऑनलाइन पद्धतीने केल्यास विद्यार्थ्यांचा प्रवेश ग्राह्य धरला जाणार नाही. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यालयाच्या प्राचार्यांची असेल, असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.

NEET पात्रता कटऑफ मध्ये यावर्षी २० गुणांनी वाढ; पाहा प्रवर्गनिहाय कटऑफ किती?

डीएड प्रवेशाचे वेळापत्रक

  • ऑनलाइन अर्ज भरणे : १३ ते २७ जून
  • अर्जांची पडताळणी करणे : १३ ते २८ जुलै
  • प्राथमिक गुणवत्ता यादीवर आक्षेप : ३ जुलै
  • गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे : ५ जुलै
  • प्रवेशाची पहिली फेरी प्रसिद्ध करणे : ६ जुलै
  • पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे : ६ ते १० जुलै
  • दुसऱ्या फेरीसाठी विकल्प देणे : ११ जुलै
  • दुसरी प्रवेश फेरी जाहीर करणे : १३ जुलै 
  • दुसरे फेरीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे :  १३ ते १७ जुलै
  • तिसऱ्या फेरीसाठी विकल्प देणे : १८ जूलै
  • तिसरी व अंतिम फेरी जाहीर करणे : २० जुलै
  • तिसऱ्या फेरीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे : २० ते २४ जुलै 
  • प्रथम वर्षाचे वर्ग सुरू करणे : २० जुलै

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo