NEET पात्रता कटऑफ मध्ये यावर्षी २० गुणांनी वाढ; पाहा प्रवर्गनिहाय कटऑफ किती?

NTA ने जाहीर केलेल्या संभाव्य कटऑफ यादीनुसार सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी NEET कटऑफ  ५० पर्सेंटाइल वर सेट केला आहे.

NEET पात्रता कटऑफ मध्ये यावर्षी २० गुणांनी वाढ; पाहा प्रवर्गनिहाय कटऑफ किती?
NEET UG 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

NEET Cutoff 2023 : NEET ( नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट) चा निकाल १२ जून रोजी जाहीर करण्यात आला. यानंतर पात्र विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी (MBBS Admission) लगबग सुरु झाली आहे. पण यंदा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने नीट परीक्षेत पात्र ठरण्यासाठी गुणांची पातळी मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढवली आहे. यावर्षी NEET पात्रता कटऑफ १३७ इतका आहे, तो मागीलवर्षी ११७ इतका होता.

NTA ने जाहीर केलेल्या संभाव्य कटऑफ यादीनुसार सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी NEET कटऑफ ५० पर्सेंटाइल वर सेट केला आहे. तर SC/ST/OBC आणि सामान्य-PH उमेदवारांसाठी, NEET पात्रता कटऑफ ४० आणि ४५ पर्सेंटाइल वर सेट केला आहे.

MBBS ला प्रवेश मिळेल का? राज्यातील शासकीय व खाजगी महाविद्यालयांचे कटऑफ पहा एका क्लिकवर

NEET परीक्षेच्या आधारे एमबीबीएस, बीडीएस, आयुष, बीव्हीएससी आणि एएच सारख्या विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश दिला जातो. एमबीबीएस साठी ९७ हजार २९३ जागा उपलब्ध आहेत. तर  बीडीएससाठी २७ हजार ८६८, आयुषसाठी ५२ हजार ७२०, बीव्हीएससीसाठी ६०३ जागा उपलब्ध आहेत.   याव्यतिरिक्त, १५ AIIMS आणि २ JIPMER संस्थांमध्ये MBBS साठी अनुक्रमे १ हजार २०५ जागा आणि २०० जागा उपलब्ध आहेत.

 

विविध वर्गासाठी NEET कटऑफ -

UR/ EWS - 50th  - ७२०-१३८

OBC/ SC/ ST - 40th - १३७-१०८

UR/ EWS & PwD - 45th – १३७-१२२

OBC & PwD - 40th – १२१-१०८

SC & PwD - 40th - १२१-१०८

ST & PwD - 40th – १२१-१०८

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo