देशभरातील शाळांमध्ये एकसमान अभ्यासक्रम? सर्वोच्च न्यायालयात याचिका, CBSE ने मांडली बाजू

राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्यात स्थानिक संसाधने, संस्कृती आणि आचार यावर जोर देण्यासाठी अभ्यासक्रमाच्या लवचिकतेवर भर देते. यामुळे विद्यार्थी अभ्यासक्रमाशी चांगल्या पद्धतीने जुळवून घेतील, असेही बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. 

देशभरातील शाळांमध्ये एकसमान अभ्यासक्रम? सर्वोच्च न्यायालयात याचिका, CBSE ने मांडली बाजू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) सर्व शाळांमध्ये एकसमान अभ्यासक्रम (Uniform Curriculum in Schools) आणि अभ्यासक्रमाची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेला (PIL) विरोध केला आहे. प्रा. अश्विनी कुमार उपाध्याय यांनी याविषयी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) जनहित याचिका दाखल केली आहे. भारतात एकसमान अभ्यासक्रम ही संकल्पना स्थानिक संदर्भ, संस्कृती आणि भाषा विचारात घेत नाही, असा मुद्दा उपस्थित करत CBSE बोर्डाने या याचिकेचा विरोध केला आहे.

 

बोर्डाने ही याचिका फेटाळण्याची मागणी केली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्यात स्थानिक संसाधने, संस्कृती आणि आचार यावर जोर देण्यासाठी अभ्यासक्रमाच्या लवचिकतेवर भर देते. यामुळे विद्यार्थी अभ्यासक्रमाशी चांगल्या पद्धतीने जुळवून घेतील, असेही बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. 

विद्यापीठातील १११ प्राध्यापक पदाच्या जाहिरातीची प्रतीक्षा संपली

 

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) आणि राज्य शिक्षण मंडळे एकतर एनसीईआरटीचा आदर्श अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके स्वीकारतात किंवा स्वतःचा अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके विकसित करतात. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना NCERT पाठ्यपुस्तके स्वीकारण्याचे किंवा त्याचे रुपांतर करण्याचे स्वातंत्र्य बोर्डाला आहे, असेही बोर्डाकडून नमूद करण्यात आले आहे. 

 

दरम्यान याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, "CBSE, ICSE आणि राज्य शिक्षण मंडळांद्वारे वेगवेगळे अभ्यासक्रम राबवतात हे भारतीय राज्यघटनेच्या कलम १४, १५, १६, २१ आणि २१अ च्या विरोधात आहेत. मातृभाषेतील एकसमान अभ्यासक्रमामुळे केवळ एकसमान संस्कृतीला चालना मिळणार नाही तर असमानता आणि भेदभावपूर्ण मूल्ये दूर होतील आणि जीवनाचा दर्जा सुधारेल."

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j