Result News : इयत्ता पाचवी व आठवीच्या मूल्यमापनाचा गुरूवारी निकाल

इयत्ता ५ वी (प्राथमिक स्तर) व इयत्ता ८ वी (उच्च प्राथमिक स्तर) मध्ये प्रविष्ठ विद्यार्थ्यांचे मूल्यमापन दिनांक २० जून २०२३ ते ३० जून २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आले होते.

Result News : इयत्ता पाचवी व आठवीच्या मूल्यमापनाचा गुरूवारी निकाल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत (MSBOS) जुन २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वीच्या मूल्यमापनाचा निकाल गुरूवारी (दि. २४) जाहीर केला जाणार आहे. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. (Maharashtra State Board of Open Schooling Result) 

मंडळाचे सचिव माणिक बांगर यांनी निकालाबाबत माहिती दिली. महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळा मार्फत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक व लातूर या सात विभागीय मंडळांमार्फत मुल्यमापन करण्यात आले.

Chandrayaan 3 Landing : इतिहास घडला! चंद्रयान-३ चे यशस्वी लँडिंग, इस्त्रोने करून दाखवलं!

इयत्ता ५ वी (प्राथमिक स्तर) व इयत्ता ८ वी (उच्च प्राथमिक स्तर) मध्ये प्रविष्ठ विद्यार्थ्यांचे मूल्यमापन दिनांक २० जून २०२३ ते ३० जून २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. त्या मूल्यमापनाचा ऑनलाईन निकाल www.msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर गुरूवार (दि. २४) रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांची विषयनिहाय श्रेणी दर्शविण्यात येणार आहे. विद्यार्थ्याला या माहितीची प्रत (Printout) घेता येईल. पात्र विद्यार्थ्यांना त्यांनी इयत्ता ५ वी / इयत्ता ८ वी पर्यंतची अर्हता व विद्याविषयक कौशल्य प्राप्त केल्याचे प्रमाणपत्र यथावकाश वितरित करण्यात येणार असल्याची माहिती बांगर यांनी दिली.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo