विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा बहरल्या; शिक्षकांनी पहिला दिवस केला अविस्मरणीय

पुण्यासह राज्यातील सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. पुणे विद्यार्थी गृह येथे विद्यार्थ्यांच्या हस्ते रिबीन कापून त्यांचा शाळेचा पहिला दिवस खास करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा बहरल्या; शिक्षकांनी पहिला दिवस केला अविस्मरणीय
Schools Fisrt Day Pune

एज्यूवार्ता न्यूज नेटवर्क

शाळेचा पहिला दिवस म्हणजे विद्यार्थ्यांप्रमाणेच (Students) पालक अन् शिक्षकांसाठीही (Teachers) जणू उत्सवच. मग उत्सव म्हटलं की, फुलांची सजावट, रांगोळीच्या पायघड्या, ढोल-ताशाचा गजर अन् पारंपरिक वेशभूषा असणारच. राज्यातील बहुतेक शाळांमध्ये (Maharashtra Schools) गुरूवारी असे आनंददायी, उत्साही वातावरण पाहायला मिळाले. शाळांचा परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने बहरून गेला होता. (On the first day, students were enthusiastically welcomed in all the schools across the state)

पुण्यासह राज्यातील सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. पुणे विद्यार्थी गृह येथे विद्यार्थ्यांच्या हस्ते रिबीन कापून त्यांचा शाळेचा पहिला दिवस खास करण्यात आला. तसेच या शाळेने विविध रंगांमध्ये मुलांचे हात बूडवून त्याचे छाप एका कागदावर घेतले. हे छाप संग्रहित करून ठेवले जाणार आहेत.   

जगाचे दूत म्हणून सेवा देण्यासाठी तयार व्हा! शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

न्यायमूर्ती रानडे बालक मंदिर येथेही चिमुरड्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. शाळेचे प्रवेशद्वार फुलांनी-फुग्यांनी सजवण्यात आले होते. विद्यार्थी प्रवेशद्वारातून आत येताच त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून शाळेचा पहिला दिवस शिक्षकांनी अविस्मरणीय केला.

न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे पाचवीच्या विद्यार्थ्यांचे आणि नवीन शैक्षणिक वर्षाचे ‘एनसीसी’च्या विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवत स्वागत केले. तसेच यावेळी पाचवीच्या विद्यार्थ्यांना अक्षरपाटी भेट देऊन पेढा भरवण्यात आला. या स्वागत कार्यक्रमाला आमदार रविंद्र धंगेकर उपस्थित होते.

जिल्हा परिषद मध्यवर्ती प्राथमिक शाळा पानशेत म्हणजेच राज्यातील पहिल्या क्लस्टर शाळेतील विद्यार्थ्यांचे तर अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले आहे. या शाळेने आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी बैलगाडीला विविध पाना-फुलांनी, फुग्यांनी सजवून या बैलगाडीत मुलांना घरापासून शाळेपर्यंत आणले. विद्यार्थ्यांचे असे स्वागत पाहून सर्वांनाच कुतहूल वाटत आहे.

वडगांव शेरी येथील राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी 'लांडग्यांना दुष्ट का म्हणतात' हे प्रबोधनपर नाटक सादर करण्यात आले. या नाटकानंतर आम्ही कोणत्याही प्रकारची जात, धर्म, वर्ण, व्यंग याबाबत कुठलीच अफवा पसरवणार नाही, अशी विद्यार्थ्यांकडून शपथ घेण्यात आली.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo