SSC Result : दहावी निकाल पाहण्यासाठी सहा अधिकृत संकेतस्थळांचा करा वापर
राज्य मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education) मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल (10th Exam Result) आज जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता मंडळाच्या सहा अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येईल.
मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांची सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये राज्याच्या एकूण निकालाची टक्केवारी तसेच विभागनिहाय निकाल व निकालाबाबतची महत्वाची माहिती गोसावी यांच्याकडून जाहीर केली जाईल. त्यानंतर दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येईल. या निकालाची प्रिंटआऊटही विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.
आज निकाल जाहीर होणार असला तरी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांसाठी वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, राज्य मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यात ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ हजार ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश होता.राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती.
ही आहेत अधिकृत संकेतस्थळे -
३. https://ssc.mahresults.org.in
४ https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board
५. https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-10th-rrsult-2023
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.