डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रक्तदानातून आदरांजली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध समाज उपयोगी उपक्रम समाजामध्ये राबवले जातात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रक्तदानातून आदरांजली
Blood Donation Camp

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे (ABVP) डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त रक्तदान (Blood Donation) शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मॉडर्न विधी महाविद्यालय (Modern College) व मॉडर्न कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. (Dr Babasaheb Ambedkar Birth Anniversary News)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध समाज उपयोगी उपक्रम समाजामध्ये राबवले जातात. डॉ. बाबासाहेब यांना जयंती निमित्त रक्तदान करून विद्यार्थ्यांनी आदरांजली अर्पण केली. यावेळी विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य व कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉ. बिबवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार घेऊन विद्यार्थ्यांनी आपले जीवन शिक्षणासोबतच समाजासाठी सुद्धा उपयोगात आणले पाहिजे.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना समर्पित तरुण निर्माण करण्याचे काम मागील ७४ वर्षापासून करत आहे, पुढेही अविरतपणे असेच कार्य अभाविपकडून केले जाईल, असा विश्वास यावेळी अंबादास मेव्हणकर, शोध संयोजक पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांनी मांडला. यावेळी ११४ विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहामध्ये रक्तदान केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत कोंडे व समारोप यशराज देशमुख यांनी केला. शिबिर प्रमुख ऋषभ घोटकुले यांनी काम पाहिले. उपक्रमाच्या नियोजनामध्ये नगर सहमंत्री तीर्थ पुराणिक, श्रेयस काशिद, अविनाश अवचार, सिद्धेश केसकर, रिद्धी तावडे, निकिता डिंबर, आकांक्षा लोंढे व अन्य कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.