बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांच्या कस्टडी रूममध्ये मद्यधुंद शिक्षकाचा राडा 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या प्रकरणी गंभीर दाखल घेतली असून जिल्हा परिषदेकडून याबाबतचा अहवाल मागितला आहे.

बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांच्या कस्टडी रूममध्ये मद्यधुंद शिक्षकाचा राडा 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

दहावी- बारावीच्या प्रश्नपत्रिका (10th-12th Question Papers)ठेवल्या जाणाऱ्या एका कस्टडी रूममध्ये (Custody room) मद्यधुंद शिक्षकाने (drunken teacher) राडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर (Sangrampur in Buldhana district)पंचायत समितीमध्ये हा प्रकार घडला असून महेंद्र रोठे या शिक्षकाने येथील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून गोंधळ घातला.त्यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) या प्रकरणी गंभीर दाखल घेतली असून जिल्हा परिषदेकडून याबाबतचा अहवाल मागितला आहे.तसेच संबंधित शिक्षावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

राज्य मंडळाच्या दहावी बारावीच्या परीक्षा सुरू असून बोर्डाच्या प्राशनपत्रिका कस्टडी रूममध्ये ठेवल्या जातात.त्याच रूमध्ये महेंद्र रोठे हा शिक्षक मद्यधुंद अवस्थेत घुसला.कस्टडी रूम अत्यंत सुरक्षित असते.या ठिकाणी नियुक्त केलेल्या व्यक्तीशीवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही.रोठे या शिक्षकाने कार्यशाळेला उपस्थित राहणे अपेक्षित होते.मात्र, त्याने कस्टडी रूममध्ये गोंधळ घातला. त्यामुळे संबंधित शिक्षावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.संबंधित शिक्षकाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. 

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले,घडलेल्या घटनेची गंभीर दाखल घेण्यात आली असून या प्रकरणी जिल्हा परिषदेकडून अहवाल मागवण्यात आला आहे.तसेच संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.शिक्षक कस्टडी रूममध्ये गेला त्यावेळी तेथे प्रश्नपत्रिका नव्हत्या.तत्पूर्वीच पेपर सुरू झाला होता.त्यामुळे प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांवर पाठवण्यता आल्या होत्या.